news

अखेर मल्हार समोर आलं मोनिकाचं सत्य…मालिका निरोप घेत असल्याचे पाहून प्रेक्षकांनी टाकला निःश्वास

स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे ही मालिका आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. इतके दिवस मोनिका आंधळी असल्याचे नाटक करून सगळ्यांना धूळ चाखत होती. पण आता मोनिकाची एक एक कारस्थानं उलगडणार असल्याने प्रेक्षकांनी निश्वास टाकला आहे. वैदेही म्हणजेच मंजुळाचा खून लपवण्यासाठी आणि स्वरा हीच मल्हार वैदेहीची मुलगी असल्याचे लपवण्यासाठी मोनिका नाही नाही ते उद्योग करत होती. यात मल्हारच्याच जीवाला धोका निर्माण झाल्याने तिच्या कटकरस्थानाचा उलगडा होताना दिसत आहे. पिहूने मल्हारला मोबाईल मधला तो व्हिडीओ दाखवला आहे. ज्यात तिनेच मंजुळाचा अपघात घडवून आणल्याचे सत्य दाखवण्यात आले आहे. अर्थात मोनिका तो पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल फोडून टाकते पण मल्हार आणि घरातील सगळ्या सदस्यांकडे तो व्हिडीओ असल्याने मोनिका पुरती भांबावून गेलेली पाहायला मिळाली आहे.

ह्या आठवड्यात मालिकेच्या कथानकाला वेग मिळाला आहे. शुभंकरच्या सांगण्यावरून मोनिका आंधळी असल्याचे नाटक करते यावर मल्हारला विश्वास बसला आहे. त्यामुळे मोनिकाचं पितळ कसं उघडं पडेल याचीच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आजच्या एपिसोडमध्ये मोनिकाचे सगळे कारस्थान उघड होणार असून तिने हे कृत्य का आणि कशासाठी केले याचा उलगडा करणार आहे. येत्या शनिवारी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट केला जात आहे. त्यामुळे मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान मालिका निरोप घेतेय म्हणून त्यातील कलाकार खुवच भावुक झाले आहेत. स्वरा, पिहू या भूमिका साकारणाऱ्या बालकलाकारांनी मालिकेच्या गोड आठवणींना उजाळा दिला आहे. तर वैदेही म्हणजेच उर्मिला कोठारे तिचे शूटिंग पूर्ण करून फॉरेनच्या ट्रीपला गेली होती. पण ट्रिपवरून पुन्हा परतून आज तिने या मालिकेचा शेवटचा सिं पूर्ण केला आहे.

tujhech mi geet gaat ahe serial news
tujhech mi geet gaat ahe serial news

मल्हार वैदेही एकत्र येणार असून स्वरा तिच्या आवाजातलं एक गाणं इथे म्हणताना दिसत आहे. याच नोटवर मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. त्यामुळे या मालिकेच्या वेळेत स्टार प्रवाह वाहिनी थोडं तुझं थोडं माझं ही नवीन मालिका प्रसारित करत आहे. ठरलं तर मग मालिकेच्या टीआरपीचा फायदा तुझेच मी गीत गात आहे या मालिकेला झाला होता. त्यामुळे मालिकेचा टीआरपी रेट देखील वाढताना दिसला. याचाच फायदा आता थोडं तुझं थोडं माझं या मालिकेलाही होणार आहे. दरम्यान समीर परांजपे आणि शिवानी सुर्वे ही फ्रेश जोडी पाहायला मिळणार असल्याने मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button