बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घोड्याची होतेय चर्चा आज हैद्राबाद मैदानात रंगणार सामना
बॉलिवूड चित्रपटांत नेहमीच अभिनेत्याचं वर्चस्व राहील आहे. पण अश्या काही अभिनेत्री देखील होत्या ज्यांनी चित्रपटात आपल्या भूमिकेने सर्वांची मने जिंकली. पूर्वी हेमा मालिनी, रेखा, श्रीदेवी ह्यांनी आपल्या अभिनयाने बक्कळ पैसे कमावला पण या अभिनेत्रींच्या आधी अभिनेत्री बिंदू हीच नाव उत्तम अभिनेत्री आणि डान्सर म्हणून घेतलं जायचं. बॉलीवूडमध्ये ७० च्या दशकापासून ९० च्या दशकापर्यंत आपल्या अदाकारीने वेगवेगळ्या भूमिका रंगवून आपलं नाव अजरामर करणाऱ्या बिंदू हिने २००० नंतर सिनेसृष्टीतून काढता पाया घेतला आज काही टीव्ही शो मध्ये त्यांना प्रमुख पाहुण्या म्हणून पाहिलं गेलं. अमिताभपासून शाहरुख अक्षय पर्यंत सर्वच कलाकारासोबत तिने काम केलं. जवळपास २५० हुन अधिक चित्रपटात तिने अष्टपैलू अभिनेत्री, डान्सर कधी आई तर कधी आजी अश्या विविधांगी भूमिका साकारल्या.
वयाच्या ११ वर्षापासूनच बिंदूने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं त्याच कारण देखील खास होत कारण बिंदूच्या वडिलांचा बॉलीवूडमध्ये दबदबा होता. बिंदूचे वडील “नानूभाई देसाई” हे त्याकाळचे मोठे चित्रपट प्रोड्युसर होते. आपल्या मुलीला मोठी अभिनेत्री बनवायचं हे त्यांचं स्वप्न होत जे बिंदुने पुढे पूर्ण केलं. अमिताभ, गोविंदा, मिथुन, अक्षय कुमार ह्यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत कधी अभिनेत्री कधी आई तर कधी खडूस सासू म्हणून त्यांनी कामे केली. बॉलीवूड मध्ये सर्वात जास्त चित्रपट करणारी अभिनेत्री म्हणून बिंदुला ओळखलं जात. कमी वयातच त्यांनी आपल्या घरा जवळ राहणाऱ्या चंपकलाल ज़वेरी यांच्यासोबत प्रेम विवाह केला. आता हे चंपकलाल ज़वेरी नक्की आहेत तरी कोण असा सवाल सर्वाना पडला असेल. वेस्टर्न इंडिया टुर्फ क्लबचे ते प्रमुख मेम्बर आहेत. चंपकलाल ज़वेरी आणि बिंदू ज़वेरी यांच्या नावे मुबंईत ज़वेरी हॉर्स स्टॅंड फार्म आहे. पुणे, मुंबई, बंगलोर, हैद्राबाद, कोलकत्ता, म्हैसूर, उटी ह्याठिकाणी घोड्यांच्या शर्यतीत त्यांचे घोडे धावतात.आज दिनांक ४ डिसेंबर २०१३ रोजी देखील हैद्राबाद घोड्यांच्या शर्यतीती देखील ५ व्या रेसमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३५ मिनीटांनी “ग्रेट गिव्हर” नावाचा बिंदूचा घोडा धावणार आहे. ३ वर्षांच्या ग्रेट गिव्हर घोड्याने आजवर ११ सामन्यात ४ वेळा २ रा क्रमांत पटकावला तर ४ वेळा ३ ऱ्या नंबरवर राहिला. पण आजच्या शर्यतीत ह्या घोड्याला विजेतेपद मिळण्याची दाट शक्यता आहे(The Great Giver horse is going to win today). घोड्यांच्या व्यतिरिक्त देखील इम्पोर्ट अँड एक्स्पोर्ट, ऍग्रीकलचर फार्म, ऍग्रीकलचर प्रॉडक्ट्स, पॉलिटरी फार्म, मिल्क प्रोड्युस अँड डेअरी प्रॉडक्ट फर्म्स असे अनेक बिजनेस हे करतात. पण त्यांचा प्रमुख धंदा हॉर्स ब्रीडिंग आणि रेसिंग हाच असल्याचा दिसून येत.
ह्या कंपन्यांच्या शेअर्स ची किंमत शेअर मार्केटमध्ये लाखो कोट्यवधींच्या घरात आहे. पुणे मुंबई यांच्या (रॉयल वेस्टर्न टुर्फ क्लब) च्या बिंदू आणि चंपकलाल ज़वेरी हे सदस्य असल्यामुळे घोड्यांच्या मोठमोठाल्या शर्यतीत आणि डर्बी च्या वेळी हे हजेरी लावतात. पुण्याच्या कोरेगाव पार्क मध्ये त्यांचं आलिशान घर आहे जे शाहरुखच्या मन्नत पेक्षाही खूप मोठं आणि आलिशान आहे. चंपकलाल ज़वेरी आणि बिंदू याना संतान नाही. त्यामुळे पुण्यात अनेक ठिकाणी बालश्रमानं बिंदू ज़वेरी नेहमी मदत करताना पाहायला मिळतात. आपण नेहमीच अभिनेत्यांच्या संपत्ती बद्दल वाचतो ऐकतो पण बिंदू ह्यांची संपत्ती पाहून अनेकांचे डोळे चक्रावले असतील हेही तितकंच खरं. काही महिन्यांपूर्वी कपिल शर्माच्या शोमध्ये बिंदुने हजेरी लावली त्यावेळी तिच्या जुन्या चित्रपटांची खूपच चर्चा रंगली होती. तो त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता असं हि त्या म्हणाल्या होत्या.