मराठी सृष्टीत कधी काय घडेल हे सांगता येणे अशक्य आहे कारण अभिनेत्री सुरुची अडारकर हिने चक्क दोन लग्न केलेल्या अभिनेत्यासोबत लग्नाची गाठ बांधली आहे. का रे दुरावा या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली सुरुची अडारकर याच कारणामुळे सध्या चर्चेत आली आहे. नुकताच सुरुचीने अभिनेता पियुष रानडे सोबत लग्न केल्याचा एक खुलासा फोटोच्या माध्यमातून केला आहे. त्यावर मराठी सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. पण सुरुची आणि पियुष हे दोघेही लग्न करतील यावर अनेकांना संभ्रम आहे. कारण हे दोघे अचानकपणे कसे काय लग्न करू शकतात असाच प्रश्न तमाम प्रेक्षकांना देखील पडला आहे. पियुष रानडे याने याअगोदर दोन लग्न केले आहेत.
अभिनेत्री शाल्मली तोळे हिच्यासोबत पियुषचे पहिले लग्न झाले होते. लग्नानंतर काही वर्षांतच दोघांनी घटस्फोट घेतला. अस्मिता या मालिकेत एकत्रित काम करत असताना पियुष मयुरी वाघ हिच्या प्रेमात पडला. आणि अस्मिता मालिका संपल्यावर लगेचच या दोघांनी लग्नाचा घाट घातला. पण पियुषचा मयुरी सोबत देखील संसार झाला नाही कारण अवघ्या दोन वर्षांतच या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पियुष पिंकीचा विजय असो या मालिकेत झळकला. तर मयुरी देखील निर्मिती क्षेत्राकडे वळली. दोन विवाह अपयशी झालेल्या पियुषला पुन्हा एकदा प्रेम झाले आणि तो चक्क आज सुरुची अडारकर हिच्याशी लग्न करताना दिसला त्यामुळे अनेकांना त्यांचे हे लग्न खरे की खोटे यावर विश्वास बसत नाहीये. पण सुरुचीने स्वतःच पियुष सोबत झालेल्या लग्नाचे पुरावे फोटोंद्वारे दिले आहेत.
आणि त्या फोटोवर तेजस्वीनी पंडित, रश्मी अनपट, सुयश टिळक, नम्रता संभेराव, ते अगदी सुकन्या कुलकर्णी, स्वाती लिमये, मुग्धा परांजपे यांनी अभिनंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे सुरुची अडारकर खरोखरच पियुष रानडे सोबत विवाहबद्ध झाली हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनी देखील या दोघांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. अर्थात अजूनही लोकांना हे लग्न पटलेलं नाही पण सुरुचीने घेतलेला हा लग्नाचा निर्णय सर्वस्वी तिचा आहे आणि या नवीन वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत.