मराठी सेलिब्रिटी विश्वात अनेक रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसात मराठी सेलिब्रिटी विवाहबद्ध होत आहेत तर काहींच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन होत आहे. नुकतेच अभिनेत्री समृद्धी केळकर हिने ‘मावशी मी होणार’ असे म्हणत बहिणीच्या डोहाळेजेवणाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेमुळे समृद्धी केळकर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. उत्कृष्ट नृत्यांगना असल्याने या मालिकेनंतर ती स्टार प्रवाह वाहिनीच्या मी होणार सुपरस्टार या शोचे सूत्रसंचालन करताना दिसली तसेच या वाहिनीच्या विविध कार्यक्रमात ती नृत्य सादर करताना पाहायला मिळाली.
अभिनेता अक्षय केळकर आणि अमृता देशमुख यांच्यासोबत ती ‘दोन कटिंग ३’ या वेबफिल्ममध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. नुकतेच समृद्धीची बहीण मानसी केळकर सोमण हिचे डोहाळजेवण पार पडले. या सोहळ्यात समृद्धीने मानसीसोबत एक नृत्य सादर केले होते. समृद्धीची बहीण मानसी ही कथ्थक नृत्यांगना आहे. डिसेंबर २०२२ मध्ये अद्वैत सोमण सोबत ती विवाहबद्ध झाली होती. आपण मावशी होणार ह्या आनंदानेच समृद्धी खूप खुश झाली आहे. बहिणीची आणि तिच्या होणाऱ्या बाळाची देखील ती आतापासूनच छान काळजी देखील घेत आहे.