अखेर अर्जुनने दिली कबुली प्रेक्षकांनी ठरलं तर मग मालिकेकडे पाठ फिरवण्या आधीच आला रंजक ट्विस्ट
महाराष्ट्राची आवडती मालिका ठरलं तर मग लवकरच एक रंजक वळण घेऊन येणार आहे. अर्जुन आणि सायलीचं खोटं लग्न सर्वांसमोर आल्याने मालिकेत भावनिक क्षण पाहायला मिळाले. सायलीला सुभेदारांचं घर सोडावं लागलं, मधु भाऊंची बोलणी खावी लागली. एका परपुरुषाबरोबर तू एकाच खोलीत राहिली हे मधु भाऊंना जरा सुद्धा पटलं नाही त्यामुळे मधु भाऊंचा राग तिच्यावर निघालेला पाहायला मिळाला. एकीकडे अर्जुन सायली एकमेकांवर खरं प्रेम करूनही अबोल राहिले. दोघे कधी एकदा एकमेकांना प्रेमाची कबुली देतात याची प्रेक्षक सतत वाट पाहून होतो.
मालिका कुठेतरी भरकटत चालली हे पाहून प्रेक्षकांनी मालिकेकडे पाठ फिरवण्यास तयारी दर्शवली. पण अशातच आता सायली आणि अर्जुन पुन्हा एकत्र आलेले पाहायला मिळणार आहेत. अखेर प्रेक्षकांची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार असल्याने मालिका अधिक रंजक होणार असे चित्र पाहायला मिळत आहे. सायली सगळ्यांपासून दूर जाणार , ती आपल्याला भेटणार नाही म्हणून अर्जुन सायलीच्या शोधात एसटी स्टॅण्ड गाठतो. पण सायली कुठेच दिसत नसल्याने तो हतबल होतो. शेवटी माईकवरून सर्वांसमोर तो सायलीला जाहीरपणे प्रेमाची कबुली देतो. मालिकेचा हा एपिसोड बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. कारण एवढे दिवस मालिका ताणून धरण्यात आली होती.
अगदी कथानक एकाच जागी खिळवून होते असेच प्रेक्षकांचे म्हणणे होते. मालिका कुठेतरी पुढे जायला हवी आणि सायली अर्जुनच्या प्रेमाचा ट्रॅक पाहायला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अखेर प्रेक्षकांनी पाठ फिरवण्याअगोदर मालिकेत हा ट्रॅक सूरु केल्याने प्रेक्षकांनी आता निश्वास टाकला आहे. आता हा प्रेमाचा ट्रॅक पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मालिकेचा टीआरपी नक्कीच अबाधित राहण्यास वाव मिळेल.