झी मराठी वाहिनीवर ‘या सुखांनो या’ ही मालिका प्रसारित होत होती. या मालिकेतील बालकलाकार नुकतीच लग्नबांधनात अडकलेली पाहायला मिळत आहे. २००५ ते २००८ या तीन वर्षाच्या कालावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. विक्रम गोखले, ऐश्वर्या नारकर, राजन भिसे, शर्वरी लोहकरे, गिरीश परदेशी, संपदा जोगळेकर, रेशम टिपणीस, लोकेश गुप्ते, उपेंद्र लिमये अशी भली मोठी स्टार कास्ट मालिकेला लाभली होती. या मालिकेत ऐश्वर्या नारकर आणि राजन भिसे यांच्या लेकीची भूमिका श्रद्धा रानडे या बालकलाकाराने साकारली होती.
समीर अधिकारी असे तिच्या पात्राचे नाव होते. या एका मालिकेमुळे श्रद्धा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. पण कालांतराने ती अभिनय क्षेत्रात फारशी पहायला मिळाली नाही. कॉलेजचे शिक्षण पूर्ण करत असताना श्रद्धाने नृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. काहीच महिन्यांपूर्वी श्रद्धाने भरतनाट्यम मध्ये विशारद मिळवली आहे. दोन दिवसांपासून श्रद्धाच्या लग्नाची लगबग सुरू होती. ग्रहमख पूजन, मेंदी सोहळा, हळद आणि संगीत सोहळ्यात तिची खास मैत्रीण अभिनेत्री अन्वीता फलटणकर हिने आवर्जून हजेरी लावली.
पाठराखीण म्हणत अन्वीताने श्रध्दाच्या लग्नात खूप धमाल केली. श्रद्धाने कोणासोबत लग्नगाठ बांधली हे अजून गुलदस्त्यात असले तरी लग्नाची बातमी तिने जाहिर करताच सेलिब्रिटींनीही श्रद्धाचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. या सुखांनो या ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे मालिकेतले कलाकारही प्रेक्षकांना चांगलेच स्मरणात आहेत. श्रद्धा रानडे ही बालकलाकार या मालिकेमुळे ओळखली जाते हे विशेष!.