झी मराठी मालिकेत मोठा बदल…प्रेक्षकांची आवडती मालिका घेतेय निरोप तर आणखी एका मालिकेच्या वेळेत होतोय बदल
कुठलीही मालिका रंजक होण्यासाठी ट्विस्ट आणले जातात. पण कधीकधी या सततच्या ट्विस्टचा लोकांना कंटाळा यायला लागतो. परिणाम मालिकेचा टीआरपी रेस कुठेतरी कमी होतो. पण झी मराठीवरील मालिकेच्या बाबतीत थोडं वेगळं पाहायला मिळालं. अप्पी आमची कलेक्टर ही मालिका ऑगस्ट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. अप्पी मोठ्या कष्टाने कलेक्टर झाली पण मालिकेतील कटकरस्थानाला प्रेक्षक कंटाळले. त्यामुळे या मालिकेकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली पण जेव्हा मालिका ७ वर्षांचा लिप घेऊन आली तेव्हा मात्र चिमुरड्या सिंबाला पाहून मालिका पाहण्यास प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली. अर्थात सिंबानेही त्याच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची निराशा केली नाही हेही तेवढेच खरे.
त्यामुळे मालिका पाहण्यात इंटरेस्ट वाढू लागला. आता अप्पी आणि अर्जुन एकत्र यावेत म्हणून सिंबा युक्ती करत आहे यात तो यशस्वी झालेलाही पाहायला मिळत आहे. पण आता हाच सिंबा प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे. कारण या हॅप्पी एंडवर मालिका निरोप घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या ३० जून रोजी अप्पी आमची कलेक्टर या मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी काहीशी नाराजी दर्शवलेली पाहायला मिळत आहे. आता कुठे सिंबामुळे आम्ही ही मालिका पाहायला लागलो होतो अशा भावना प्रेक्षक व्यक्त करताना दिसत आहेत. पण लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आगमनामुळे अप्पी आमची कलेक्टर या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. दरम्यान तूला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेला अजून बरेचसे कथानक बाकी आहे. या मुळे तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. येत्या १ जुलै पासून संध्याकाळी ८ वाजता ही नवीन मालिका प्रसारित केली जाणार आहे.
ह्यावेळेत टीआरपी मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे श्वेता शिंदे तिची ही मालिका या वेळेत टेलिकास्ट करत आहे. अर्थात श्वेता शिंदेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव अगोदरच घेतलेला आहे . लागीरं झालं जी, देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी खुप चांगला प्रतिसाद दिला होता. लाखात एक आमचा दादा ही मालिका सुद्धा अशाच धाटणीची असल्याने प्रेक्षक या मालिकेला प्रतिसाद देतील असा तिला विश्वास आहे. या मालिकेतून नितीश चव्हाण पुन्हा एकदा नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे तर पूजा कातूर्डे त्याची नायिका असणार आहे. पण या मालिकेमुळे प्रेक्षक अप्पी आमची कलेक्टर सारख्या चांगल्या मालिकेला मुकणार हे आता निश्चित झाले आहे. पण मालिकेतील अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळालेली नाहीयेत कारण मनी मावशी, संग्राम, पिहू या पात्रांबद्दल उलगडा होणे गरजेचे होते. अर्थात मालिकेच्या शेवटी हे सगळे पात्र समोर येतील आणि सुखाने नांदतील अशी आशा आहे.