news

पण का कशासाठी… ईदच्या शुभेच्छा देताना प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ट्रोल

मराठी मालिका सृष्टीत काम करत असलेली अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली आहे. हिजाब आणि ईदच्या शुभेच्छा देणारा तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिला अन फॉलोच केलं आहे. खरं तर आज बकरी ईदच्या निमित्ताने रुचिराने शुभेच्छा देणारा व्हिडीओ शेअर केला होता मात्र या व्हिडिओवर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया तिला मिळू लागल्या आहेत. पण का आणि कशासाठी? तुला आपले सण आठवत नाहीत का असेही तिला आठवून देण्यात आले आहे. या ट्रोलिंगला रुचिराने उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे. रुचिरा ही तिच्या आगामी प्रोजेक्ट मध्ये बिजी आहे. Bollyalands. com या इंटरनॅशनल ट्रॅव्हल शोचे शूटिंग करण्यासाठी ती बहरन देशात गेली आहे. तिथे गेल्यानंतर तिने शूटिंगसाठी घालण्यात असलेला हिजाबवरच एक व्हिडिओ बनवला आणि तो तिने आज सोशल मीडियावर शेअर केला.

पण चाहत्यांकडून प्रचंड ट्रोलिंग होत असल्याचे पाहून रुचिराने त्यावर एक प्रतिक्रिया दिली आहे. ” ह्या अशा पद्धतीच्या ट्रोलिंगला पाहून मला प्रचंड धक्का बसला आहे. मी फक्त एक ड्रेस घेतलाय जिन्स आणि एक स्कार्फ आहे . हा माझ्या कामाचा एक भाग आहे जो मी कॅमेऱ्यासमोर उभी राहून करत आहे. कर्म आणि धर्म संजणाऱ्यांसाठी ही पोस्ट आहे बाकीच्या तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करतायेत ते समजत नाही. महाराजांचा उल्लेख करणार्यांना विचारायचंय , महाराजांनी कधी दुसऱ्या धर्माचा निरादर करायचा शिकवला.. ज्यांनी माझ्या बायोबद्दल शंका उपस्थित केली त्यांना मला सांगायचंय की, त्यांना गीतेतला कर्मयोग समजला असता तर तुमची रिऍक्शन वेगळी असती. तुमच्या भवनांचा आदर आहे.

ruchira jadhav marathi actress
ruchira jadhav marathi actress

मी काय करते याची मला जाणीव आहे.” असे म्हणत रुचिराने तिचं म्हणणं ट्रोलर्सकडे व्यक्त केलं आहे. दरम्यान या पोस्टमुळे रुचिरा सोशल मीडियावर आता चर्चेचा विषय ठरली आहे. रुचिरा जाधव बिग बॉसच्या घरात दिसली होती. काहीच दिवसांपूर्वी तिने ठरलं तर मग मालिकेत छोटीशी भूमिका साकारली होती.. त्यानंतर आता ती इंटरनॅशनल ट्रॅव्हल शो साठी काम करत आहे. पण या पोस्टमुळे तिला आता ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button