serials

ठरलं तर मग मालिकेतील अभिनेत्याची मुलगी देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री .. साऊथच्या चित्रपटांत करते प्रमुख भूमिका

कलाकार आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच पाहायला मिळते. आपल्या आवडत्या कलाकारांची मुलं काय करतात, ती कशी दिसतात याचे नेहमी कुतूहल असते. ठरलं तर मग या मालिकेतील तन्वीचे वडील म्हणजेच रविराज किल्लेदार गेली कित्येक वर्षे मराठी इंडस्ट्रीशी जोडलेले आहेत. मालिकेचा नायक साकारण्यापासून ते चित्रपट, हिंदी मालिकेत सहाय्यक भूमिका त्यांनी निभावल्या आहेत. सागर तळशिकर हे त्यांचं नाव. खरं तर रविराज किल्लेदारांची भूमिका त्यांच्या खूप जवळची आहे कारण अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर सागर तळशिकर हे वकीली करत होते. त्यामुळे खऱ्या आयुष्यात ते ही भूमिका जगले होते असे म्हणायला हरकत नाही.

tharla tar mag serial actor sagar talshikar
tharla tar mag serial actor sagar talshikar

ठरलं तर मग या मालिकेत ते नायिकेचे वडील आहेत पण खऱ्या आयुष्यात त्यांच्या मुलीसुद्धा अभिनेत्रीसारख्याच सुंदर आहेत. मृण्मयी आणि आर्जवी या दोन मुली तसेच अंजोर हा मुलगा त्यांना आहे. सागर तळशिकर यांच्याच पावलावर पाऊल टाकत आर्जवीने मॉडेलिंग क्षेत्रात एन्ट्री केलेली आहे. कॉटन किंगच्या नामांकित ब्रॅण्डच्या जाहिरातीत आर्जवी झळकली असून एका तेलगू चित्रपटासाठी तिने अभिनय केला आहे. आज फादर्स डे निमित्ताने सागर तळशिकर यांनी त्यांच्या मुलांची ओळख करून दिली आहे. आर्जवीचा फोटो ते कित्येकदा सोशल मीडियावर शेअर करताना दिसले आहेत.

actress Aarjavee Raaj
actress Aarjavee Raaj

आर्जवीच्या संदर्याची मराठी सेलिब्रिटींनाही भुरळ पडलेली पाहायला मिळते. संयोगीता भावे, राधिका विद्यासागर, सीमा देशमुख, कविता मेढेकर, यांनीही तिच्या दिसण्याचं कौतुक केलेलं पाहायला मिळतं. आर्जवीने मराठी इंडस्ट्रीत नशीब आजमावे असेही मत सागर तळशिकर यांना चाहत्यांकडून करण्यात येत. ती या इंडस्ट्रीत दाखल झाली तर नक्कीच मोठं यश मिळवू शकेल असा विश्वास त्यांना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button