serials

शिवा मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत तांत्रिक गोंधळ….झी मराठीचे ऑफिशियल स्टेटमेंट समोर

झी मराठी वाहिनीवर १२ फेब्रुवारी पासून दोन नव्या मालिका प्रसारित होणार असे जाहीर करण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी ७.३० वाजता ” पारू” मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर पूर्वा कौशिक आणि शाल्व किंजवडेकर यांची प्रमुख भूमिका असलेली “शिवा” मालिका रात्री ९.०० वाजता प्रसारीत होणार होती. पण या मालिकेचे ठरलेल्या वेळेत प्रक्षेपणच झाले नसल्याने प्रेक्षकांचा पुरता हिरमोड झालेला पाहायला मिळाला. शिवा मालिकेची उत्कंठा त्याच्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांना लागून होती. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेनंतर शाल्व किंजवडेकर पुन्हा एकदा मुख्य भूमिका साकारणार होता. पूर्वा आणि शाल्वची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक टिव्हीकडे डोळे लावून होते. मात्र पहिल्याच दिवसाच्या प्रसारणात खोळंबा झालेला पाहायला मिळाला. झी मराठी वाहिनीवरील तांत्रिक बिघाडामुळे मालिका प्रेक्षकांच्या समोर आलीच नाही.

shiva marathi serial
shiva marathi serial

त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले. अर्थात आता तांत्रिक कारणास्तव मालिकेचा पहिला भाग आज १३ फेब्रुवारी रोजी प्रसारित केला जाणार आहे. झी मराठी वाहिनीने अजून या मागचे कारण सांगितलेले नाही त्यांचे ऑफिशियल स्टेटमेंट देखील काय असेल हे लवकरच जाहीर करण्यात येईल. पण प्रेक्षकांप्रमाणेच मालिकेचे कलाकार देखील पहिल्या एपिसोड साठी खूपच उत्सुक होते. पण काही कारणास्तव मालिकेचे प्रसारण थांबवण्यात आले. दरम्यान झी ५ च्या माध्यमातूनही या दोन्ही मालिकांचे प्रसारण झाले नाही असेही आता समोर आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणून धरण्यात आली आहे. पारू मालिकेचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला. मालिकेतील कोर्लोस्कर कुटुंबीयांचा बडेजावपणा प्रेक्षकांच्याही डोळ्यात चमक देऊन गेला. मालिकेचा सेट आणि तिथले वातावरण प्रेक्षकांना विशेष भावलेले पाहायला मिळाले. त्यामुळे मालिकेचे शूटिंग नेमके कुठे होत आहे याबद्दल विचारणा होऊ लागली आहे. अर्थातच ह्या ठिकाणाची माहिती लवकरच समोर येईल. पण तूर्तास आज प्रसारित होणाऱ्या शिवा मालिकेच्या पहिल्या एपिसोडसाठी प्रेक्षक तेवढेच उत्सुक असणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button