serials

ऑन स्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात विवाहबद्ध…चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही आश्चर्याचा सुखद धक्का

ऑन स्क्रीन एकत्रित काम करत असताना अनेक कलाकारांमध्ये प्रेम जुळून येतं. अशातच आयुष्यभराचा जोडीदार म्हणून हे कलाकार त्याच्याशी लग्नगाठ बांधताना पाहायला मिळतात. जीव माझा गुंतला मालिकेतील अशीच एक ऑन स्क्रीन जोडी आज विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीवर जीव माझा गुंतला ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. मालिकेतील अंतरा आणि मल्हारच्या जोडीने जवळपास २०२१ ते २०२३ या कालावधीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. पण आता मालिकेनंतर हे दोघे पुन्हा एकत्रित आलेले पाहायला मिळत आहेत. आज ३ मार्च रोजी अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी लग्न करून चाहत्यांना आश्चर्याचा एक सुखद धक्काच दिला आहे.

antara and malhar in serial jeev maza guntala
antara and malhar in serial jeev maza guntala

“Forever हमसफर” असे म्हणत या दोघांनी लग्नाचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यावर सेलिब्रिटींकडून आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. योगिता आणि सौरभ दोघांच्या ऑन स्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. पण मालिकेनंतर हे दोघे क्वचितच एकत्र पाहायला मिळाले. त्यामुळे हे दोघेही लग्न करतील की नाही यावर कोणी विचारच केला नव्हता. ऑन आज अचानक या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचा खुलासा केलेला पाहायला मिळतो आहे. लग्नासाठी मरून रंगाच्या साडीत योगिता नवरी म्हणून सजली तर सौरभनेही सफेद रंगाचा कुर्ता आणि धोती असा पेहराव केला आहे.

yogita chavan and saurabh chaughule wedding photos
yogita chavan and saurabh chaughule wedding photos

योगिता चव्हाण बद्दल सांगायचं तर तिने महाराष्ट्राची श्रावण क्वीन या सौंदर्य स्पर्धेत फर्स्ट रनर अप होण्याचा मान पटकावला होता. त्यानंतर तिने नाटकातून काम केले. जाडुबाई जोरात, नवरी मिळे नवऱ्याला, राडा, गावठी, शिवा अशा मालिका, चित्रपटातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. जीव माझा गुंतला या मालिकेमुळे योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले दोघेही प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. मालिकेतील त्यांच्या जोडीला विशेष पसंती मिळत असल्याने दोघांनी लग्न करावं असे अनेक सल्ले त्यांना त्यांच्या चाहत्यांकडून मिळत होते. याचाच विचार करून आज त्यांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांसोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सौरभ चौघुले आणि योगिता चव्हाण दोघांनाही आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button