serials

सुमित पुसावळे पाठोपाठ कलर्स मराठी गाजवणाराआणखी एक नायक स्टार प्रवाह वाहिनीवर… शिवानी सुर्वे सोबत नव्या मालिकेत एन्ट्री

स्टार प्रवाह वाहिनीवर १७ जूनपासून ‘थोडं तुझं थोडं माझं’ ही नवी मालिका प्रसारित होत आहे. या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला त्यात अभिनेत्री शिवानी सुर्वे प्रमुख भूमिका साकारणार हे समोर आले. पण मालिकेच्या नायिकेनंतर यात नायक कोण असणार असा प्रश्न सर्वानाच पडला. कारण शिवानी सुर्वेच्या तोडीस तोड नायक असावा अशी मागणी केली जाऊ लागली. याअगोदर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा प्रोमो असाच उत्कंठा वाढवणारा ठरला होता. कारण मालिकेचा नायक कोण असणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. अखेरीस रेश्मा शिंदे सुमित पुसावळे सोबत स्क्रीन शेअर करणार हे पाहून प्रेक्षकांनी सुमितचे स्वागतच केलेले पाहायला मिळाले.

sameer paranjape and shivani surve in thod tuza ani thod maz serial
sameer paranjape and shivani surve in thod tuza ani thod maz serial

या फ्रेश जोडीनंतर आता थोडं तुझं थोडं माझं या मालिकेची उत्कंठा वाढलेली आहे. पण आता नायक कोण असणार यामागचा पडदा हटलेला आहे. शिवानी सुर्वे हिच्यासोबत अभिनेता समीर परांजपे स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे हे स्पष्ट झाले आहे. समीर परांजपे हा एक उत्तम अभिनेता आहे. गोठ, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून त्याने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून त्याची अचानक एक्झिट झाल्याने तो पुन्हा त्या मालिकेत कधी परतणार अशी चर्चा पाहायला मिळाली होती. पण त्यानंतर समीरने सिंगिंग रिऍलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून हजेरी लावलेली पाहायला मिळाली. बाळू मामाच्या नावानं चांगभलं ही मालिका सोडून सुमित स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत झळकतो आहे.

thod tuz aani thod maaz serial actress
thod tuz aani thod maaz serial actress

तर समीर परांजपे हा कलर्स मराठीचा नायक म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर आता स्टार प्रवाह वाहिनीवर दिसणार आहे. त्यामुळे कलर्स मराठीचे हे दोन्ही नायक आता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचा नवीन प्रोमो लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे त्यात समीर प्रमुख भूमिका साकारत असल्याचे निश्चित झाले आहे. शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे ही फ्रेश जोडी छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. दरम्यान मालिकेत या दोघांची नोकझोक पाहायला मिळणार आहे. हे दोघेही कलाकार अशा भूमिकेसाठी योग्य ठरतील असा विश्वास आहे. या नवीन मलिकेसाठी समीर परांजपे आणि शिवानी सुर्वे यांचे अभिनंदन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button