serials

ठरलं तर मग मालिकेतील दिग्दर्शकाचं झालं लग्न.. अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

मराठी मालिका विश्वातील सध्याची टीआरपीच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर असलेली मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. ‘ठरलं तर मग’ मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीची हि मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रथम क्रमांक ठिकवून ठेवताना पाहायला मिळत आहे. ह्याच श्रेय मालिकेतील सर्व कलाकारांसोबतच मालिकेच्या दिग्दर्शकाला देखील जात. मालिकेचं दिग्दर्शक सचिन गोखले यांच्या बाबत एक आनंदाची बातमी मालिकेतील अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर हिने शेअर केली आहे. ती बातमी म्हणजे ठरलं तर मग मालिकेतील दिग्दर्शक सचिन गोखले विवाह बंधनात अडकल्याची.

sachin gokhale and asawari mehendale wedding photos
sachin gokhale and asawari mehendale wedding photos

अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर हिने सचिन गोखले ह्यांच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. दिग्दर्शक सचिन गोखले यांनी आसावरी मेहेंदळे यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. लग्नाचा फोटो शेअर करत तिने नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मालिकेतील कलाकारांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो. दिग्दर्शक सचिन गोखले ह्यांनी ‘ठरलं तर मग’ ह्या मालिके पूर्वी देखील “हम बने तुम बने” एका गोड कुटुंबाची गोड Love Story ह्या मालिकेच दिग्दर्शन केलं होत. ‘असं माहेर नको ग बाई’ ह्या मालिकेचं दिग्दर्शन देखील सचिनचं त्यासाठी सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक म्हणणं सचिनला सन्मानित देखील करण्यात आलं होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button