news

ठरलं तर मग मालिकेतील अभिनेत्रीने स्वकमाईने घेतलं घर.. वास्तुशांतीची फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी

ठरलं तर मग मालिकेत अभिनेत्री रुचिरा हिची नुकतीच एन्ट्री झाली आहे. अर्जुनच्या या खास मैत्रिणीच्या भूमिकेत अभिनेत्री रुचिरा जाधव झळकली आहे. रुचिराच्या येण्याने मालिका एका रंजक वळणावर जाऊन पोहोचणार आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत देखील रुचिराने अशाच धाटणीची भूमिका साकारलेली पहायला मिळाली होती. त्यानंतर मराठी बिग बॉसच्या शोमध्ये झळकण्याची तिला मोठी संधी मिळाली होती. पण आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर रुचिरा पुन्हा एकदा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या एंट्रीमुळे अर्जुन आणि सायलीच्या नात्यात नक्कीच जवळीक वाढणार आहे.

ruchira jadhav buy new home
ruchira jadhav buy new home

त्यामुळे मालिकेतला हा ट्विस्ट पाहण्यासाठी प्रेक्षक तेवढेच उत्सुक असणार आहेत. पण अभिनेत्री रुचिराच्या आणखीन एका पोस्टमुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री रुचिरा जाधव हिने नुकतीच पोस्ट करून घर घेतल्याची बातमी आणि काही फोटो शेअर केले आहेत. ह्या फोटोंमध्ये तिचे आई वडील आणि बहीण घरात प्रवेश करताना दिसत आहेत. प्रथमच आपल्या कमाईच्या पैश्यातून तिने घरच्यांना छोटंसं सुख दिलं असल्याचं म्हटलं आहे. दारावर आई वडिलांच्या नावाची पाटी लावत आई वडिलांना तिने हे घर घर गिफ्ट दिल्याचं समजत.

ती म्हणते ” घर जिथे सुख आहे ! घर म्हणजे जिथे माझीमाणसं हसत आहेत! माझ्या जीवनात फक्त काही छोट्या गोष्टी आहेत ज्या माझ्या आत्म्याला आनंद आणि समाधान देतात! माझ्या पालकांचे स्मितहास्य, माझे कार्य त्यात वरचेवर आहे आणि माझ्या स्वप्नाच्या जवळ एक पाऊल टाकण्याच्या या प्रवासात, मला जाणवले की “घर बनवणे” त्यापैकी एक असणे आवश्यक आहे!” तिच्या ह्या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरच तिने नवीन घरात प्रवेश केला असल्याचं समजत. पण तिच हे घर कुठे आहे हे मात्र तिने कुठेही नमूद केलेलं पाहायला मिळत नाही. असो अभिनेत्री रुचिरा जाधव हिला तिच्या नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button