news

नागराज मंजुळे यांच्या भावाला पाहिलंय … आता झळकणार प्रमुख भूमिकेत

अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माता अशी ओळख असलेल्या नागराज मंजुळे यांचा भाऊ भूषण मंजुळे हे ‘रीलस्टार’ या चित्रपटातून प्रथमच प्रमुख भूमिका साकारत आहेत. आतापर्यंत नागराज मंजुळे यांनी चित्रपट दिग्दर्शनात भरीव योगदान दिलेले पाहायला मिळाले आहे. त्यांचा भाऊ भूषण मंजुळे हे देखील उत्तम अभिनेते म्हणून ओळखले जातात. सिम्मी जोसेफ आणि रॉबिन वर्गीस हे रीलस्टार या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. यापूर्वी भूषण मंजुळे हे कारखाणीसांची वारी, फँड्री, सैराट , घर बंदूक बिरयानी, झुंड यासारख्या हिंदी मराठी चित्रपटातून सहाय्यक भूमिकेत दिसले होते. झुंड चित्रपटात त्यांनी अमजदचे सहाय्यक पात्र साकारले होते. तर भाऊ नागराज मंजुळे सोबत कॅमेऱ्यामागे राहूनही त्यांनी त्यांच्या चित्रपटाची कामं सांभाळली आहेत.

nagraj manjule brother bhushan manjule
nagraj manjule brother bhushan manjule

पण आता प्रथमच भूषण मंजुळे यांना रीलस्टार चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. भूषण या भूमिकेला योग्य न्याय देतील त्यांची अभिनय शैली उत्तम आहे . तसेच या चित्रपटासाठी एक फ्रेश चेहरा हवा होता, त्याला लोक इतर चित्रपटामुळे ओळखतात प्रेक्षकांना तो नवखा वाटू नये म्हणून आम्ही या भूमिकेसाठी त्याची निवड केली असे मत चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी जोसेफ यांनी व्यक्त केलं आहे. भूषण मंजुळे सोबत या चित्रपटात उर्मिला जगताप स्क्रीन शेअर करणार आहे. सोबतच रुचिरा जाधव, प्रसाद ओक, विजय पाटकर, कैलाश वाघमारे, मिलिंद शिंदे, स्वप्निल राजशेखर, सुहास जोशी, दीपक पांडे, शिवाजी पाटने, महेश सुभेदार या कलाकारांची त्यांना साथ मिळणार आहे. बालकलाकार अर्जुन गायकर, तनिष्का म्हाडसे हे देखील महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

bhushan manjule with wife sarita bagade manjule
bhushan manjule with wife sarita bagade manjule

जे ५ एंटरटेनमेंट आणि इनिशिएटिव्ह फिल्म्स यांच्या बॅनरखाली रीलस्टार या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. दरम्यान नागराज मंजुळे यांचा भाऊ भूषण मंजुळे प्रथमच प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार असल्याने त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. रीलस्टार या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. आणि वर्षभरात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल असेही बोलले जात आहे. भूषणच लग्न झालं असून पत्नीच नाव सरिता बगडे मंजुळे असं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button