serials

गेला दीड आठवडा ह्या गोड मुलीला फार त्रास दिला मी… मालिकेला निरोप देताना म्हणतो आता तरी Ludo मध्ये cheating

झी मराठीवरील पारू या मालिकेत आता लवकरच पारूवरचे संकट टळणार आहे. कारण पारूसोबत लग्न करणाऱ्या अजयची पोलखोल होणार आहे. काही दिवसांपूर्वी पारु मालिकेत अजयच्या पात्राची एन्ट्री झाली होती. दिशाच्या सांगण्यावरून हा अजय पारूसोबत लग्न करण्यासाठी तयार झाला होता. त्यासाठी तो खोटे आईबाबा घेऊन पारुच्या वडिलांसोबत लग्नाची बोलणी करायला आला होता. पण आता अजय हा खोटा मुलगा आहे आणि तो पारूला फसवतोय हे आदित्यच्या लक्षात आले आहे. त्यामुळे अजयच्या तावडीतून तो पारूला सोडवायला गेला आहे. दरम्यान अजयची भूमिका अभिनेता सचिन देशपांडे याने साकारलेली आहे.

Sharayu Sonawane in paru serial
Sharayu Sonawane in paru serial

याअगोदर देखील त्याला अशाच धाटणीच्या भूमिका मिळाल्याने सचिन प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे गेला होता. त्यामुळे आपण आताही प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जाणार हे त्याला ठाऊक होते. अजयचे पात्रच मुळात नायिकेला छळणारे होते त्यामुळे ही भूमिका करताना दडपण येणार असे त्याला वाटत होते. पण पारू म्हणजेच शरयू सोनवणे हिने त्याचे हे दडपण पूर्णपणे घालवले. लवकरच जयच्या पात्राची मालिकेतून एक्झिट होत आहे. नुकताच सचिनने या मालिकेला निरोप दिला आहे. पण शरयू सोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता असे सचिन तिच्याबद्दल म्हणतो. मालिकेला निरोप देताना सचिनने शरयूबद्दल एक मजेशीर पोस्ट लिहिली आहे.

sachin deshpande and sharayu sonawane paaru serial
sachin deshpande and sharayu sonawane paaru serial

त्यात तो म्हणतो की,” गेला आठवडा दीड आठवडा ह्या गोड मुलीला फार त्रास दिला मी (On Screen) पण Off Screen आम्ही खुप छान मित्र झालो, तसं काम फार दिवसांच नव्हत, पण जे काही उपद्व्याप करायचे होते त्यासाठी शरयू सोनावणे ने comfortable असणं फार गरजेचं होतं पण उलट तिनेच मला comfortable केलं. शरयू सोनावणे बघ मी सगळं चांगल बोललो आहे तुझ्या बद्दल आता तरी Ludo मध्ये cheating करू नकोस आता नवीन काम, नवीन भूमिका घेऊन लवकरच येतो तुमच्या समोर. खुप खुप प्रेम सगळ्यांना”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button