news

36 गुणी जोडी मालिकेतील कलाकार विवाहबद्ध… फोटो होत आहेत व्हायरल

मराठी कलाविश्वात लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या काही दिवसात अनेक कलाकार विवाहबद्ध झाले आहेत तर अनेकांनी साखरपुडा करून आयुष्याला नवीन सुरुवात केलेली आहे. अशातच ३६ गुणी जोडी या झी मराठीवरील मालिकेतील अभिनेता तेजस डोंगरे यानेही लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळत आहे. ३६ गुणी जोडी या मालिकेत तेजसने सुरुवातीला विक्रांतची भूमिका साकारली होती. विक्रांत आणि आरती या दोघांचे लग्न व्हावे म्हणून मालिकेचे नायक नायिका दोघेही प्रयत्न करत होते. पण मधल्या काळातच तेजसने या मालिकेतून काढता पाय घेतला त्यानंतर विक्रांतची भूमिका स्वानंद केतकर साकारताना दिसला होता. तेजसने मालिकेतून काढता पाय घेतल्याने प्रेक्षकांनी थोडीशी नाराजी दर्शवली होती.

पण या मालिकेअगोदर तेजसने आई मायेचं कवच मालिकेतून लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेत तो अनेकदा अनुष्का पिंपूटकर सोबत रील बनवताना दिसला. मालिकेतली रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्ये लग्नबंधनात अडकतीये का अशी त्यावेळी चर्चा पाहायला मिळाली होती. पण कालांतराने अनुष्का रंग माझा वेगळा या मालिकेकडे वळली तर तेजसने देखील त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले. Ingnitic ideas नावाने तेजसचा स्वतःचा बिजनेस देखील आहे. ३६ गुणी जोडी मालिकेनंतर तेजस डोंगरे आता त्याच्या आयुष्याला नवीन सुरुवात करताना पाहायला मिळत आहे. नुकतेच तेजसने डॉ हर्षिता गोस्वामी सोबत लग्नगाठ बांधली आहे. हळद, मेंदी, संगीत सोहळा अशा मोठ्या थाटात या दोघांनी लग्नगाठ बांधून आयुष्याला नवीन सुरुवात केली आहे. लग्नानंतर हे दोघेही स्वित्झर्लंड येथे फिरायला गेले होते.

actor tejas dongre with wife harshita goswami
actor tejas dongre with wife harshita goswami

तेजसची पत्नी हर्षिता ही डेंटिस्ट आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच या दोघांचे लग्न पार पडले होते. तेव्हा लग्नाचे काही खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. मराठी इंडस्ट्रीत आता कलाकार मंडळी लग्नासाठी वेळ लावत नाहीत अशीच चित्र समोर येऊ लागली आहेत. कारण मधल्या काळात मनोरंजन विश्वात लग्न झालेल्या कलाकारांना कामं मिळणे कठीण होत होते पण आताच्या घडीला या विचारांना फाटा दिला जात आहे. योग्य वेळी लग्न करून ही मंडळी आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत. कलाकारांचे हेच विचार आता कौतुकास्पद मानले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button