ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्राची आवडती मालिका आहे. त्यामुळे या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करून आहेत. अर्थात विरोधी भूमिकेत असलेली अस्मिताही कधीकधी तिच्या गोंधळामुळे प्रेक्षकांना हसवून जाते. त्यामुळे हे पात्र विशेष लक्षवेधी ठरलेले आहे. हे पात्र अभिनेत्री मोनिका दबडे हिने साकारलं आहे. काही दिवसांपूर्वीच मोनिकाने तिच्या प्रेग्नन्सीची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर आता तिची स्वप्नपूर्ती पूर्ण झाल्याने हा आनंद द्विगुणित झाला आहे.
नुकतेच मोनिकाने तब्बल १६ लाख किंमतीची Tata Nexon ही गाडी खरेदी केली आहे. “स्वप्नपूर्ती आणि तयारी” असे म्हणत आणखी एका बातमीची तयारी सुरू झाल्याचे तिने म्हटले आहे. मोनिकाच्या या स्वप्नपूर्तीबद्दल सेलिब्रिटींनीही तिचे अभिनंदन केले आहे. मोनिकाने याअगोदर मानसीचा चित्रकार तो, स्वराज्यजननी जिजामाता, चिंतामणी, लव्ह लफडे अशा चित्रपटातून, मालिकेतून काम केले आहे. तर तिचा नवरा चिन्मय कुलकर्णी हाही स्टॅण्डअप कॉमेडीयन आहे. गेल्या वर्षी सहज म्हणून मोनिकाने तिचा युट्युब चॅनल सुरू केला होता.
रोजचे रुटीन, रेसिपीज आणि सेटवरची धमाल मस्ती अशा ब्लॉगमुळे ती सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवताना दिसली. ठरलं तर मग या मालिकेच्या कलाकारांसोबत तिचे छान बॉंडिंग तयार झाले आहे. आता ती आई होणार या बातमीने सेटवर आनंदाचे वातावरण आहे. पण यामुळे मोनिकाला काही दिवस तरी मालिकेतून ब्रेक घ्यावा लागेल हे वेगळे सांगायला नको. तुर्तास मोनिकाला तीच्या या स्वप्नपूर्ती बद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!.