मराठी सृष्टीतील कलाकारांना लग्नाचे वेध लागले आहेत. डिसेंबर महिन्यात तब्बल ५ कलाकार लग्नगाठ बांधत आहेत. देवमाणूस आणि लागीरं झालं जी मधील अभिनेता किरण गायकवाड येत्या १४ डिसेंबरला अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर सोबत लग्न करत आहे. त्यामुळे किरणचं ठरलं आता तुझं कधी? असे प्रश्न त्याच्या कलाकार मित्रांना पडले आहेत. किरण गायकवाड याने लागीरं झालं जी मालिकेत विरोधी भूमिका साकारली होती. याच मालिकेत विक्याची भूमिका साकारणारा अभिनेता निखिल चव्हाण याने नुकतीच एक लग्नाबद्दलची मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. निखिल चव्हाण हा गेली अनेक वर्ष नाटक, चित्रपट, मालिकेतून काम करतो आहे.
लागीरं झालं जी मालिकेत त्याची भूमिका सहाय्यक होती. या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवलं होतं. निखिल चव्हाण हाही लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढू शकतो अशी एक हिंट त्याने दिली आहे. “किरण गायकवाड चं ठरल्यापासून Leo पण विचारतोय तुझं कधी?” अशी एक पोस्ट शेअर करताना त्याने त्याच्या leo सोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या या पोस्टवरून चाहते वाहिनीला टॅग करू का? असंही म्हणत आहेत. निखिल चव्हाण गेले काही वर्षे अभिनेत्री अनुष्का सरकटे हिला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या दोघांनी कारभारी लयभारी या झी मराठीच्या मालिकेतून एकत्रित काम केलं होतं. २०२० साली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर जवळपास दीड वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले पाहायला मिळाले होते. या मालिकेनंतर निखिल आणि अनुष्का दोघे एनेकदा एकत्र पाहायला मिळाले.
यावरून ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत असे म्हटले जाते. तेव्हा आता किरण गायकवाड पाठोपाठ निखिल चव्हाणच्याही लग्नाचा लवकरच बार पडणार असे चित्र दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी निखिलने डिसेंबर महिना म्हणत एक शेवट आणि एक नवीन सुरुवात म्हणत एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर शिवानी बावकर हिने डिसेंबर महिन्याला अधोरेखित करत एक कमेंट केली होती. यावरून निखिल आणि अनुष्का डिसेंबर मध्येच लग्नाची बातमी जाहीर करणार असे दिसून येते.