झी मराठीवरील पारू या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. काहीच दिवसांपूर्वी मालिकेत अनुष्काची एन्ट्री झाली होती. ही भूमिका अभिनेत्री श्वेता खरात हिने साकारली आहे. अनुष्का आणि आदित्य दोघांचे लग्न व्हावे यासाठी अहिल्यादेवी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या दोघांना एकत्र वेळ मिळावा, एकमेकांना समजून घेता यावं म्हणून अनेक गोष्टी घडताना दिसत आहे. मात्र त्यात पारूची लुडबुड प्रेक्षकांना खटकत आहे. पारु आदित्यला नवरा मानते पण आता ही अनुष्का आल्यामुळे पारूला स्वतःला नोकर म्हणत आदित्यच्या लायकीची नसल्याची खात्री देत आहे.
पण अनुष्का ही दिशा ची बहीण आहे हे सत्य जेव्हा उलगडेल तेव्हा मात्र ही पारू तिचा नक्कीच समाचार घेईल. दरम्यान आदित्य पारूच्या प्रेमात आहे याची जाणीव करून देण्यासाठी एक पात्र मालिकेत एन्ट्री घेत आहे. हे पात्र पारूच्या प्रेमात पडणार असल्याने आदित्य मात्र अनसेफ असल्याचे फिल करणार आहे. पारूवरच्या प्रेमाची त्याला कुठेतरी जाणीव व्हायला हवी त्यामुळे हे पात्र तेवढेच महत्वाचे असणार आहे. म्हणूनच ही भूमिका साकारण्यासाठी अभिनेता ऋग्वेद फडकेची एन्ट्री होणार आहे. ऋग्वेद फडके हा पारूचा प्रेमवीर बनून तिला मदत करणार आहे.
याअगोदर ऋग्वेदनेअबोल प्रीतीची अजब कहाणी, तसेच स्टार प्रवाहच्या थोडं तुझं थोडं माझं मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. कधी गंभीर तर कधी विरोधी भूमिकेसाठीही ऋग्वेद ओळखला गेला आहे. पारू मालिकेत त्याचे मजेशीर पात्र आहे. त्यामुळे या मजेशीर कॅरॅक्टरची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. या नवीन भूमिकेसाठी ऋग्वेद फडके याला खूप खूप शुभेच्छा!.