news

ठरलं तर मग मालिकेतील अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया… गेल्या दोन आठवड्यापासून आयसीयूमध्ये

आवडती मालिका आणि त्यातील कलाकारांसोबत प्रेक्षकांचे एक छान बॉंडिंग तयार झालेले असते. त्याचमुळे एक दिवस हरी मालिका मिस झाली तर ती दुसऱ्या दिवशी रिपीट टेलिकास्टच्या वेळी पुन्हा पाहिली जाते. मालिकेतील एखाद्या पात्राला काही खाजगी कारणास्तव सुट्टी घ्यावी लागली तरी ते पात्र परत कधी बघायला मिळणार याची आतुरता लागून राहिलेली असते. ठरलं तर मग ही मालिका म्हणजे प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून पूर्णा आजी मिसिंग आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनीही पुर्णा आजी कुठे गेल्या असे प्रश्न पडले आहेत. या प्रश्नाचे उत्तर त्यांची मुलगी तेजस्विनी पंडित हिने दिले आहे. खरं तर पुर्णा आजी म्हणजेच ज्योती चांदेकर या गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी आहेत.

actress jyoti chandekar news
actress jyoti chandekar news

प्रकृती अधिकच खालावल्याने त्याना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. ज्योती चांदेकर यांना मणक्याचा त्रास आहे. काही महिन्यांपूर्वी त्या मालिकेच्या सेटवर अचानकपणे चक्कर येऊन पडल्या होत्या. शिवाय त्यांना गुडघे दुखीचाही त्रास आहे, त्यामुळे बऱ्याचदा त्यांचे सिन खुर्चीवर बसूनच दाखवण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या या त्रासाला सामोरे जात असल्याने डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. पित्ताशय आणि मणक्याच्या त्रासामुळे ज्योती चांदेकर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गेली दोन आठवडे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते अशी माहिती तेजस्विनी पंडितने दिली आहे. “तूर्तास काळजीचे काही कारण नाही आणि या शस्रक्रिये नंतर तिला आता बरं वाटू लागलं आहे, लवकरच तुमची पूर्णा आजी मालिकेत दाखल होईल”, असा तिने विश्वास दिला आहे.

tharla tar mag actress jyoti chandekar
tharla tar mag actress jyoti chandekar

ज्योती चांदेकर सध्या घरीच अराम करत आहेत यावेळी मालिकेच्या कलाकारांनी त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट दिली होती. मालिकेतील त्यांची नात अस्मिता म्हणजेच मोनिका दबडे आणि विमल म्हणजेच मयुरी मोहिते या दोघी ज्योती चांदेकर यांची भेट घेण्यासाठी घरी गेल्या होत्या. तेव्हा ज्योती चांदेकर यांच्या तब्येतीत कमालीची सुधारणा झाली होती. त्यामुळे आता लवकरच त्या पूर्णा आजीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालेल्या पाहायला मिळतील. दरम्यान ज्योती चांदेकर यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांनीही त्यांना सुदृढ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button