news

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घटस्फोटाच्या बातमीने खळबळ…१४ वर्षांच्या संसारानंतर

सध्या कलासृष्टीत लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे मराठी सृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी लग्न गाठ बांधलेली पाहायला मिळाली तर हिंदी सृष्टीतही अरबाज खानचे लग्न खूप चर्चेत राहिले. तर दुसरीकडे मात्र आता मराठमोळ्या अभिनेत्रीची घटस्फोटाची बातमी समोर आल्याने सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे. ही मराठमोळी अभिनेत्री आहे ईशा कोप्पीकर. ईशा कोप्पीकर हिने २००९ साली हॉटेल व्यावसायिक असलेल्या टीमी नारंग सोबत लग्नगाठ बांधली होती. पण आता १४ वर्षांचा त्यांचा हा संसार मोडीत निघालेला पाहायला मिळत आहे. ईशा कोप्पीकर हिने याबाबत अजून कुठलाही खुलासा करण्याचे टाळले आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून ती घटस्फोटाच्या प्रक्रियेला सामोरी जात असल्याचे तिच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

isha koppikar with husband and daughter
isha koppikar with husband and daughter

नोव्हेंबर महिन्यात ईशा कोप्पीकर आणि टीमी नारंग यांनी घटस्फोट घेतला अशी माहिती आता समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ईशा मुलीसह तिच्या आई वडिलांसोबत राहत आहे. त्यामुळे या बातमीला दुजोरा दिला जात आहे. ईशाने तिच्या नावासमोर असलेले नारंग हे नाव अजून सोशल मीडियावरून हटवलेले नाही. पण याबाबत ती लवकरच योग्य तो खुलासा करेल असे म्हटले जात आहे. ईशा कोप्पीकर हिने बॉलिवूड सृष्टीत चांगली प्रसिद्धी मिळवली आहे. एफयु आणि मात या मराठी चित्रपटात ईशा कोप्पीकर हिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या ईशाला पुढे अनेक बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. कंपनी, डरना जरुरी है, मैने प्यार क्यूँ किया, एक विवाह ऐसा भी, डरना मना है, एलओसी कारगिल, कांटे, या चित्रपटात तिने कधी प्रमुख भूमिका कधी सहाय्यक भूमिका तर कधी विरोधी भूमिका देखील साकारली.

isha koppikar divorce news
isha koppikar divorce news

तिने काही वेबसिरीजमध्येही काम केले असून तिचा एक आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र अशातच आता ईशा कोप्पीकर पती टीमी नारंग पासून वेगळी झाली असल्याचे सांगितले जात आहे. रियाना ही ९ वर्षांची तिची मुलगी सध्या ईशासोबतच राहत आहे. टीमी आणि ईशा दोघांनीही त्यांचे हे नाते टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र नोव्हेंबर महिन्यातच त्या दोघांनी घटस्फोट घेतला असल्याचे आता समोर आले आहे. मिडियाने तिच्याशी संपर्क साधला असता “याबाबत मी सध्या काहीच सांगू शकत नाही” असा एक मेसेज दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button