सेम टू सेम कार्तिकीच… सारेगमप लिटिल चॅम्प्स विजेती कार्तिकी गायकवडच्या ११ महिन्याच्या बाळाची पहिली झलक आली समोर

सारेगमप लिटिल चॅम्प्स विजेती कार्तिकी गायकवड हिने मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या रोनित पिसे यांच्याशी २०२० साली विवाह केला. माझ्या ध्यानीमनी नसताना अगदी अनपेक्षितपणे सगळं घडलं. माझे होणारे सासरे हे वडीलांचे जुने स्नेही आहेत. पत्रिका बघून, बघण्याचा वगैरे कार्यक्रम होऊन हे रीतसर अरेंज्ड मॅरेज ठरलं आहे. आम्हा दोघांची क्षेत्रं खूप वेगळी आहेत. त्यांच्याकडेही संगीताची आवड आहे. कलेविषयी आदर आहे. अगदी स्वत: गाणारे नसले, तरी ते कानसेन आहेत’, असं कार्तिकीनं एका मुलाखतीत म्हटलं होतं.

26 जुलै रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला होता. आणि काही दिवसानंतरच दोघांनी लग्न केलं. लग्नाच्या ३ वर्षानंतर म्हणजेच १४ मे २०२४ रोजी त्यांनी सुंदर बाळाला जन्म दिला. कार्तिकिच्या बाळाचे नाव ‘रिशांक’असे ठेवले आहे. नुकतेच कार्तिकीने तिच्या या बाळाची झलक चाहत्यांना दाखवली आहे. “नीज बाळा”…हे अंगाई गीत कार्तिकीने गायलं असून या अंगाई गीताला कौस्तुभ गायकवाड ने संगीत दिलं आहे. ११ महिन्यांनंतर कार्तिकीने खास अंदाजामध्ये मुलाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली.

हे गाणं कार्तिकी, रोनीत पिसे आणि तीचा मुलगा रिशांक यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. याच अंगाई गीताच्या माध्यमातून तिने तिच्या मुलाची पहिली झलक दाखवून दिली आहे. रिशांक अगदी कार्तिकी गायकवाड सारखाच सेम टू सेम दिसतो, अशा प्रतिक्रिया देखील नेटकऱ्यांकडून तिला मिळत आहेत.