news

“तू मुलांना नादी लावतेस” इतकंच काय तर जुईचा घटस्फोट झालाय तिला मुलंही आहेत… प्रसिद्धीच्या झोतात आल्यावर लोकांनी

ठरलं तर मग मालिकेमुळे जुई गडकरीला चांगली लोकप्रियता मिळू लागली आहे. याअगोदर पुढचं पाऊल या मालिकेसाठी तिला नावाजले गेले होते. एक अभिनेत्री म्हणून २००९ पासून जुई गडकरीचा मराठी मालिका सृष्टीत यशस्वी प्रवास सुरु आहे. एका दर्जेदार चित्रपटातून तिला भूमिका साकारण्याची इच्छा आहे. आयुष्यात गंभीर आजारपण , आसपास प्रचंड नकारात्मकता असूनही जुईने या गोष्टींवर अध्यात्मिकतेच्या मार्गाने मात केली आहे. नुकतीच या प्रवासावर प्रकाश टाकणारी एक मुलाखत तिने दिली आहे. त्यात तिने तिच्या आयुष्यातील अनेक धागेदोरे उलगडले आहेत. शालेय परीक्षेत जेमतेम मार्क मिळवणारी जुई कॉलेजमध्ये कल्चरल कोट्यातून प्रवेश मिळवताना दिसली. गाण्याची तिला प्रचंड आवड असल्याने अभ्यासात तिला मुळीच रस नसायचा. अशातच एका मैत्रिणीला ऑडिशन द्यायचे म्हणून फक्त सोबत गेलेल्या जुईची निवड करण्यात आली आणि तिचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला.

marathi actress jui gadkari
marathi actress jui gadkari

त्यानंतर जुईकडे एकाचवेळी तीन तीन मालिकेची ऑफर येऊ लागली. पण ही तारेवरची कसरत करत असताना जुईला प्रचंड धावपळ करावी लागली. यात एक वेळ अशीही आली की आता आपल्याला ह्या क्षेत्रात काम करणं थांबवायला हवं एक साधी नोकरी करून आयुष्य छान जगावं असा तिने विचार केला. त्याचदरम्यान पुढचं पाऊल मालिकेत तिची प्रमुख भूमिकेसाठी निवड करण्यात आली. आईने समजावल्यानंतर जुईने ही मालिका स्वीकारली. काम मिळवण्यासाठी जुईला अजिबात स्ट्रगल करावा लागला नाही कारण एक काम संपलं की दुसरं काम मिळत गेलं असे ती सांगते. दरम्यान बाहेरचं खाणं, पार्ट्या करणं हे जुईच्या आसपासही नव्हतं त्यामुळे मिळालेले पैसे ती सेव्ह करायची. त्यामुळे आर्थिक चणचण तिला कधीच भासली नाही. यातूनच घर घेण्याचं तीच स्वप्न पूर्ण झालं. मराठी इंडस्ट्रीने जुईला अनेक चांगले वाईट अनुभव दिले. आजारपणामुळे जुईच्या हातून अनेक चांगले प्रोजेक्ट निसटले. तर काहींनी तिला बॉडी शेमिंग वरून ट्रोलही केले.

jui gadkari marathi actress
jui gadkari marathi actress

त्याचमुळे जुई काम संपलं की पॅक अप करून आपलं घर गाठते. एकदा एका अभिनेत्रीने जुईला ‘तू मुलांना नादी लावतेस’ असा टोमणा मारला होता. जुईने तिचं म्हणणं खूप मनाला लावून घेतलं होतं त्यानंतर आईने तिची समजूत घातली आणि जिथल्या तिथे उत्तर देण्यास सांगितले पण जुई मुळचीच अबोल असल्याने तिने ह्या गोष्टी मनाला लावून घेतल्या पण आता मी या गोष्टीवर लक्ष देत नाही असे ती सांगते. त्यावर जुई म्हणते की मी जर मुलांना नादी लावणारी असते तर आतापर्यंत कितीतरी मुलांना मी फिरवलं असतं. पण मला ज्याच्यावर प्रेम करायचंय त्याच्याशीच मला लग्न करायचंय असे ती प्रांजळपणे तिचं मत मांडते. जुईचा घटस्फोट झालाय तिला मुलंही आहेत अशा अफवा तिच्याबद्दल पसरवण्यात आल्या. या अफवांवर मी फक्त हसते असे ती सांगते. माझं लग्न व्हावं यासाठी मीच खूप उत्सुक आहे आणि ते जेव्हा होईल तेव्हा मी ते सगळ्यांना सांगणारच आहे. मी बऱ्याचदा सेटवरचे फोटो शेअर करत असते त्यामुळे गळ्यातलं मंगळसूत्र पाहून माझं लग्न झाल्या असल्याच्या अफवा पसरू लागल्या. मलाही माझ्या हक्काचं मंगळसूत्र गळ्यात घालून मिळवायचं आहे असे ती या लोकांना उत्तर देते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button