news

झुमका वाली पोर फेम विनोद कुमावत विरोधात बलात्काराचा गुन्हा….पहिल्या पत्नीला घटस्फोट देणार सांगून पीडित तरुणीला

गेल्या वर्षी विनोद कुमावत याचं ‘झुमका वाली पोर’ हे गाणं जोरदार व्हायरल झालं होतं. भारतात युट्युबवर सगळ्यात जास्त पाहिलं गेलेलं हे गाणं सातव्या क्रमांकावर पोहोचलं होतं. हे गाणं नाशिकच्या विनोद कुमावत याने लिहिलं होतं त्या गाण्यात तो राणी कुमावत सोबत झळकला होता. खान्देशी भाषेत असलेलं हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसलं होत. पण या गाण्याचा नायक विनोद कुमावत याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून दीड वर्षे लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणी विनोदवर पीडितेने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय पहिली पत्नी आणि एक मुलगा असल्याचे या पीडितेला समजताच तिने याबाबत विनोदकडे चौकशी केली असता विनोदकडून तिला मारहाण करण्यात आली होती असे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पीडित तरुणी हिला सोशल मीडियावर रील बनवण्याची आवड होती.

rani kumavat and vinod kumavat humka wali por
rani kumavat and vinod kumavat humka wali por

विनोद कुमावत याने त्याच्या सोशल अकाउंटवरून त्या तरुणीशी ओळख वाढवली. माझ्या गाण्यात काम करण्यासाठी एका सुंदर तरुणीची आवश्यकता असल्याचे त्याने तिला संगीतले. तेव्हा त्या तरुणीने त्याच्या अल्बममध्ये काम केले. डिसेंबर २०२२ मध्ये विनोदने संधीचा फायदा घेऊन पीडित तरुणीवर लैगिंक अत्याचार केले. लग्नाचे अमिश दाखवल्याने पीडित तरुणीने याबद्दल कुठेही वाच्यता केली नव्हती. वारंवार लैंगिक अत्याचार करूनही पीडित तरुणी गप्प बसून होती. मात्र विनोद अगोदरच विवाहित आहे आणि त्याला एक मुलगाही आहे अशी माहिती त्या तरुणीला मिळाली. तेव्हा तिने या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी विनोदला विचारले. तेव्हा त्याने त्या तरुणीला शिवीगाळ करत मारहाण केली, पण नंतर मी पहिल्या पत्नीला घटस्फोट देणार असल्याचे विनोदने तिला आश्वासन दिले. त्यानंतर विनोदने त्या पीडित तरुणीला लग्न करण्यासाठी हुंडा मागितला. घरची परिस्थिती बेताची असल्याने तरुणीच्या वडिलांनी हुंडा देण्यास नकार दिला. त्यानंतर विनोदने त्या तरुणीला गाण्यात काम देण्याचे थांबवले. तिला सोशल मीडियावर ब्लॉकही केले.

vinod kumavat jhumka vali song actor
vinod kumavat jhumka vali song actor

तेव्हा पीडित तरुणीने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच विनोद कुमावत विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फसवणूक आणि लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणी विनोद कुमावत विरोधात तरुणीने तक्रार दाखल केली आहे. दरम्यान ही तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून झुमका वाली फेम राणी कुमावत आहे हे उघड झाले आहे. राणी कुमावत आणि विनोद कुमावत हे दोघे लग्नही करणार होते. मात्र काही दिवसांपासून या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलेले पाहायला मिळाले. कित्येक दिवस झाले दोघांचे एकत्रित व्हिडीओ का नाहीत असेही त्यांच्या चाहत्यांकडून विचारण्यात येऊ लागले. काही दिवसांपूर्वी विनोद कुमावत याचे एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले त्यात राणी कुमावत हिला डच्चू देण्यात आल्याचे निदर्शनास आले. मात्र आता विनोद कुमावत विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असल्याने ती पीडित तरुणी कोण आहे हे समोर आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button