बदलून द्या अन्यथा नुकसानभरपाई द्या… तब्बल ८० लाखांची गाडी खरेदी केली आणि ५ दिवसात बिघडली मराठी अभिनेत्याचा संताप

गेल्या काही दिवसांत मराठी कलाकारांनी महागड्या गाड्या खरेदी करण्याची चढाओढ सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपट अभिनेता पुष्कर जोग याने त्याची लेक फेलिशाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रेंज रोव्हर ही महागडी गाडी खरेदी केली होती. फेलिशाने ही इच्छा पुष्करजवळ बोलून दाखवली होती. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी लेकीचा वाढदिवस म्हणून त्याने तिला सरप्राईज देत रेंज रोव्हर खरेदी केली. पण अवघ्या ५ दिवसातच त्याला या महागड्या गाडी खरेदीचा फटका बसला आहे.
१८ फेब्रुवारी रोजी गाडीतील कम्प्युटरवर इंजिनमध्ये बिघाड असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुष्करने रेंज रोव्हरच्या ऑफिशिअल अकाउंटला टॅग करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे. एक इन्स्टास्टोरी शेअर करताना पुष्कर याबद्दल सांगतो की, “मी १३ फेब्रुवारी रोजी रेंज रोव्हर गाडी खरेदी केली. १८ फेब्रुवारी रोजी कारच्या इंजिनमध्ये बिघाड असल्याचं त्याच्या कम्प्युटरमध्ये सांगण्यात आलं. हे खूपच निराशाजनक आहे. कृपया हे बदलून द्या अन्यथा नुकसानभरपाई द्या” असे म्हणत त्याने रेंज रोव्हर ऑफिशिअल अकाउंटकडे तक्रार केली आहे.

पुष्कर जोगने रेंज रोव्हरची velar ही गाडी खरेदी केली होती. या गाडीची ऑनरोड प्राईस ही ९० लाखांच्या घरात जाते. इतकी महागडी गाडी घेऊनही त्याबद्दल जर ५ दिवसातच अशी तक्रार जाणवू लागत असेल तर कंपनीने नुकसानभरपाई द्यावी अशी त्याची मागणी आहे. दरम्यान पुष्कर जोग हा लहान असल्यापासूनच चित्रपटातून काम करतो आहे. महेश कोठारे यांच्या जबरदस्त या चित्रपटाने त्याला नायक म्हणून समोर आणले होते. अभिनेता, निर्माता अशा भूमिकेत तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘हार्दिक शुभेच्छा’ हा त्याचा आगामी चित्रपट २१ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.