लाखात एक आमचा दादा मालिकेत सूर्याच्या आईची एन्ट्री… आईशी भेट होऊ नये म्हणून जालिंदर करणार कटकारस्थान

लाखात एक आमचा दादा या मालिकेत लवकरच एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वी तुळजाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा परदेशी हिने मालिकेतून काढता पाय घेतला त्यामुळे ही भूमिका आता अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर साकारत आहे. दिशा परदेशी हिची तब्येत खालावल्याने तिने या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तर आता मृण्मयीच्या जोडीला आणखी एका अभीनेत्रीची मालिकेत एन्ट्री होणार आहे. मालिकेचा नायक म्हणजेच सूर्याच्या आईची आता एन्ट्री होत आहे.
जालिंदरमुळे सूर्याची आई जेलमध्ये गेली आता ती पॅरोलवर सुटणार असल्याने जालिंदर अस्वस्थ झाला आहे. अशातच सूर्या आणि तुळजा शिबिरानिमित्त जेलमध्ये हजेरी लावणार आहेत. तुळजा सूर्यावर नाराज असते तिला मनवण्यासाठी सुर्या सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. पण आता तुळजाला शिबिरानिमित्त जेलमध्ये जाण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे सुर्या देखील हीच संधी साधून तुळजाच्या बरोबर तिथे जाणार आहे. पण तिथे सूर्याची आणि त्याच्या आईची भेट घडून येणार का? असा एक ट्विस्ट समोर येणार आहे. सुर्या आणि त्याच्या आईची भेट घडू नये यासाठी जालिंदर प्रयत्न करत असतो. त्यामुळे मालिकेतले हे रंजक वळण प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

सुर्याच्या आईची भूमिका अभिनेत्री राजश्री निकम साकारत आहेत. मालिकेत सूर्याची बहीण धनुचं लग्न जुळवण्याचा घाट सुरू आहे. अशातच तिच्या आईच्या एंट्रीने लग्नात विघ्न तर येणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान राजश्री निकम यांनी या मालिकेअगोदर मन धागा धागा जोडते नवा, लाडाची मी लेक गं, का रे दुरावा, तू तिथे मी अशा मालिकांमधून काम केले आहे. सूर्या आणि त्याच्या आईची भेट होऊ नये यासाठी जालिंदर काय युक्ती आखतो हे पाहावे लागेल. तूर्तास या नवीन भूमिकेसाठी राजश्री निकम यांना शुभेच्छा!.