मराठी सृष्टीतील लोकप्रिय कलाकारांचं ‘हिरण्य फार्महाऊस’ पाहिलंत? १२ ते १५ वर्षे कष्ट घेऊन फुलवली हिरवळ

आजवर परेश मोकाशी आणि मधूगंधा कुलकर्णी या दाम्पत्याने दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. एलिझाबेथ एकादशी, कोकरू, मुक्काम पोस्ट डोंबिलवाडी, हरिश्चंद्राची फॅक्टरी, नाच ग घुमा ह्या आणि अशे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी बनवले. नुकताच त्यांनी स्वतःच्या फार्महाउसचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हे फार्म हाऊस उभं करण्यासाठी या कलाकारांना १२ ते १५ वर्षे कष्ट घ्यावे लागले. अभिनेत्री लेखिका मधूगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी या दाम्पत्याचं हे टुमदार फार्महाऊस आहे.
एका वैराण जमिनीवर एक छोटंसं घर बांधून वनराई फुलवण्याचा त्यांचा मानस होता. पाच वर्षांपूर्वी त्यांनी या फार्महाऊसमध्ये विविध झाडं लावली. यावर्षी आंबा, पेरू, चिक्कू अशा फळझाडांना फळं लागली आहेत. पावसाळ्याअगोदर आणखी काही झाडं लावण्याची त्यांची इच्छा आहे. झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट हा अनुभव शहरात घेता येत नाही. जन्माने शेतकरी, वृत्तीने वारकरी आणि कर्माने फिल्मकरी त्याचमुळे निसर्गाच्या जवळ जाता यावं म्हणून त्यांनी हे फार्महाऊस उभं केलं आहे.

वेळ मिळेल तेव्हा हे दोघेही फार्म हाऊसला जाऊन राहतात आणि निसर्गाचा आनंद घेतात.माणसांप्रमाणेच त्यांचं श्वानांवर देखील प्रेम आहे. त्यांना ते आपल्यातलंच मानतात. म्हणून एक नाही तर ३ श्वान त्यांनी तेथे पाळलेली पाहायला मिळतात. फार्म हाऊसचा व्हिडिओ शेअर करताना मधूगंधा कुलकर्णी म्हणतात “फ… फ… फार्मचा ! जन्माने शेतकरी , वृत्तीने वारकरी आणि कर्माने फिल्मकरी ! माझा विठ्ठल माझा निसर्ग आहे. त्याच्या जवळ जाण्याचा थोडा प्रयत्न .शेती, झाडं , जमिनीवरच घर सत्यात उतरतं तो अनुभव घेणं आणि तो जगणं…हे माझ्या ह्या सिरीज मधुन मी शेअर करतेय. आशा आहे तुम्हा सगळ्यांना आवडेल ! तुमचा अभिप्राय नक्की कळवा.निसर्गाचा विजय असो !”