आपल्या आवडत्या कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल गोष्टी जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडतं. अभिनेत्री सुप्रिया पाठारे या देखील गेली अनेक वर्षे या इंडस्ट्रीत काम करून लोकप्रियता मिळवताना दिसल्या आहेत. विनोदी भूमिका असो, गंभीर अथवा खलनायकी बाज असलेल्या भूमिका सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या अभिनयाने सुंदर वठवलेल्या पाहायला मिळाल्या. सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीरने ठाण्यात हॉटेल व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाला सुप्रिया पाठारे यांनीही जमेल तसा हातभार लावला. वेळप्रसंगी त्यांनी स्वतः हॉटेलची जबाबदारी संभाळलेली पाहायला मिळाली. बालपण अतिशय कष्टात गेलेल्या सुप्रिया पाठारे यांनी आर्थिक घडी बसवत संसाराची गाडी सुरळीत चालवली त्यात नवरा मिनेश पाठारे यांचीही साथ मिळाली.
सुप्रिया पाठारे त्यांच्या नवऱ्याचा फोटो क्वचितच प्रसंगी सोशल मीडियावर शेअर करतात मात्र आता एक आगामी प्रोजेक्ट निमित्ताने त्यांनी त्यांच्या लग्नातला खास फोटो प्रथमच चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यांच्या लग्नातला हा फोटो पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. लग्नातला हा फोटो शेअर करण्यामागे एक खास कारण आहे. ‘पाहिले न मी तुला’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने सुप्रिया पाठारे यांनी हा फोटो शेअर करताना पूर्णिमा तळवलकर आणि सई कल्याणकर यांना टॅग केलं आहे.
लग्नाच्या फोटोची आठवण सांगताना त्या म्हणतात की, “लग्नातले क्षण. लग्ना नंतरचे सुरुवातीचे क्षण. किती गोड असतात नाही!ते सगळे क्षण आपण कॅमेऱ्यात कैद करून ठेवतो, पुढे जाऊन पुन्हा पुन्हा बघण्यासाठी. पण इतक्या वर्षांच्या सहवासात, संसाराच्या सहजीवनात, काळाच्या, जबाबदाऱ्यांच्या ओघात, प्रेमाचे, संसाराच्या सुरुवातीचे क्षण बघण राहूनच जात. एक फोटो सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत करून टाकतो. पोटात पुन्हा तोच गोळा येतो. प्रेमाची फुलपाखर अवती भोवती घिरट्या घालू लागतात. बॅकग्राऊंडला ‘पेहेला नशा पेहेला खुमार’ चा piano ऐकू येतो आणि ओठांवर इतकंच येत, “पाहिले न मी तुला” माझ्यासोबत तुम्ही ही तुमचा “पाहिले न मी तुला” moment जगा व सगळ्यांसोबत share करा. या moment साठी मी पुढे nominate करत आहे वेगळीच मज्जा आहे. अनुभवून बघा. सुमुख चित्र + अनामिका प्रस्तुत दोन अंकी नाटक “पाहिले न मी तुला” लवकरच रंगभूमीवर!”