मराठी तसेच हिंदी चित्रपट आणि मालिकांत सुकन्या कुलकर्णी नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. सुकन्या कुलकर्णी यांचे संजय मोने सोबत लग्न झाले तेव्हा त्यांच्या वडिलांची भक्कम साथ त्यांना मिळाली होती. आपल्या सुनेला ते सून म्हणून नाही तर लेक म्हणूनच वागणूक देत होते. आपल्या पोटी जे मूल जन्माला येईल ते आपल्या सासऱ्यांसारखं म्हणजेच बाबांसारखं दिलखुलास असावं अशी सुकन्या कुलकर्णी यांची ईच्छा होती. पण लग्नानंतर अनेक वर्षे त्यांना मूल होत नव्हतं. अशातच सुकन्या यांचं जन्मगाठ हे नाटक चालू असताना त्यांचा अपघात झाला.
या अपघातात त्यांची वाचा गेली, एवढंच नाही तर चार दिवसांचं अंधत्वही आलं होतं. त्यांना नृत्य बंद करावं लागलं. या आजारपणातून उठल्यानंतर त्यांनी पुन्हा नृत्याला सुरुवात केली. पण दुर्दैवानं जून १९९३ मध्ये पुन्हा त्यांचा अपघात झाला. त्या वेळेस त्यांची पुन्हा वाचा गेली, सतत सहा महिने त्यांना बोलता येत नव्हतं. तसंच त्यांची संपूर्ण उजवी बाजू पॅरालाइज्ड झाली होती. सक्तीची विश्रांती घ्यावी लागली, थायरॉईड वाढलं आणि पुढे मग वजनही वाढत गेलं. ‘हे वजन मी वाटलं तरी कमी करू शकत नाही’ असे हताश होऊन त्या सांगताना दिसतात. – सुकन्या कुलकर्णी यांच्या बदल आणखीन वाचा..