news

तुला शिकविन चांगलाच धडा मालिका अभिनेत्रीची थाटात पार पडलं लग्न… या अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ

सध्या कला सृष्टीत लग्नसोहळ्याचे वारे वाहू लागले आहेत. नुकतीच अभिनेत्री रेश्मा शिंदे हिच लग्न झालं. तर अभिनेता शाल्व किंजवडेकर, अभिनेत्री शिवानी सोनार, यांचीही लग्नाची लगबग सुरू झालेली आहे. तर लागीरं झालं जी मधील अभिनेता किरण गायकवाड येत्या १४ डिसेंबरला अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर सोबत लग्न करत आहे. अशातच रॉकेट-चंची’ अडकले लग्नबांधनात. तुला शिकविन चांगलाच धडा मालिका अभिनेत्रीचं थाटात झालं लग्न…अभिनेत्री विरिशा नाईक हिने १२ डिसेंबर रोजी अभिनेता प्रशांत निगडे सोबत ही लग्नगाठ बांधली आहे. तुला शिकविन चांगलाच धडा या मालिकेत विरिशाने चंचलाची भूमिका साकारलेली होती.

virisha naik and prashant nigde wedding photos
virisha naik and prashant nigde wedding photos

तर अभिनेता प्रशांत निगडे याने लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत रॉकेटची भूमिका साकारली आहे. प्रशांत निगडे आणि विरिशा नाईक दोघांनी ‘आय एम पुंगळ्या शारूक्या आगीमहूळ’ या नाटकात एकत्र काम केले होते. या नाटकाचे लेखन , दिग्दर्शन स्वतः प्रशांत निगडे यांनी केलं होत.काल त्यांच्या लग्नाला या दोन्ही मालिकेच्या कलाकारांनीही हजेरी लावलेली पाहायला मिळाली.सध्या स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत तो ‘रॉकेट’ची भूमिका साकारत आहे. मालिकेतील त्याचे हे पात्र मजेशीर असल्याने त्याची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. याअगोदर प्रशांत निगडे यांनी स्वाभिमान मालिकेत बबनचे पात्र साकारले होते.

virisha naik and prashant nigde marriage photos
virisha naik and prashant nigde marriage photos

१५ ऑगस्ट रोजी प्रशांत निगडे आणि विरिशा नाईक यांचा साखरपुडा पार पडला होता. आता १२ डिसेंबर २०२४ रोजी दोघे विवाहबद्ध झाले. तुला शिकविन चांगलाच धडा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असे बोलले जात आहे. लक्ष्मी निवास या मालिकेच्या आगमनामुळे हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, किंवा मालिकेच्या प्रसारण वेळेत बदल होईल असेही म्हटले जात आहे. असो अभिनेत्री विरिशा नाईक आणि अभिनेता प्रशांत निगडे यांना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button