serials

नायिकेपेक्षा नायकच लई भारी….प्रथमच नायकाच्या एंट्रीला मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ही मालिका आहे तुझेच मी गीत गात आहे. तुझेच मी या मालिकेत आता बऱ्याच घडामोडी घडू लागल्या आहेत. सत्य समोर येऊ नये म्हणून मोनिका स्वराच्या हात धुवून मागे लागली आहे. तर याच गडबडीत मल्हारचा अपघात घडून येतो. हे प्रकरण मल्हारच्या जीवावर बेतत असल्याने तो कधी संकटातून बाहेर येईल याचीच सगळे वाट पाहत आहेत. आणि याच मालिकेच्या शेवटी स्वराच मल्हारची मुलगी आहे हे त्याला कळेल. त्यामुळे मालिकेचा शेवट गोड होऊन येत्या १५ जूनला तुझेच मी गीत गात आहे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी थोडं तुझं थोडं माझं ही मालिका प्रसारित होत आहे.

१७ जूनपासून रात्री ९ वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो जेव्हा प्रेक्षकांच्या समोर आला होता तेव्हा शिवानी सुर्वे प्रमुख भूमिकेत झळकणार हे स्पष्ट झाले होते. पण तिच्या जोडीला तेवढाच तगडा नायक असावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यानंतर समीर परांजपे मुख्य भूमिकेत दिसणार हे समोर आले. समीर परांजपे झळकलेला मालिकेचा हा दुसरा प्रोमो प्रेक्षकांची मनं जिंकून घेताना दिसला. कारण या प्रोमोमध्ये समीर डॅशिंग भूमिकेत दिसला. तर आता मालिकेच्या तिसऱ्या प्रोमोलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. समीर परांजपे आणि शिवानी सुर्वे यांच्या या एकत्रित शूट झालेल्या प्रोमोवर प्रेक्षकांनी छान प्रतिक्रिया दिल्या आहेत. नायिकेपेक्षा नायकच लई भारी म्हणत प्रेक्षकांनी समीर परांजपेचं मोठं कौतुक केलं आहे. अर्थात तो या गेटअपमध्ये शिवानी पेक्षा जास्त लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

thod tuz aani thod maaz serial photos
thod tuz aani thod maaz serial photos

त्यामुळे बऱ्याच प्रतीक्षेनंतर मालिकासृष्टीत नायकाच्या एंट्रीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तेजस प्रभू असे समीरच्या पात्राचे नाव आहे. या मालिकेअगोदर समीरने गोठ या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यानंतर तो सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत अभ्याच्या भूमिकेत झळकला. पण नायिकाप्रधान मालिका असूनही समीरने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. कालांतराने पात्राच्या एक्झिटमुळे समीरला या मालिकेतून काढता पाय घ्यावा लागला होता. तरीही तो या मालिकेत पुन्हा परत यावा अशी मागणी होऊ लागली. पण आता थोडं तुझं थोडं माझं मधून एका दमदार भूमिकेतून पुन्हा तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button