serials

स्टार प्रवाहची ही लोकप्रिय मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप…शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण करताना कलाकार भावुक

स्टार प्रवाह वाहिनी गेल्या तीन वर्षाहून अधिक काळापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या वाहिनीने टीआरपीच्या स्पर्धेत स्वतःचे स्थान टिकवून ठेवले आहे. या वाहिनीवर लवकरच लक्ष्मीच्या पाऊलांनी ही नवी मालिका दाखल होत आहे तर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतेच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले त्यावेळी मालिकेचे कलाकार एकमेकांचा निरोप घेताना भावुक झाले. मालिकेच्या सेटवर केक कापून कलाकारांनी ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे शीर्षक गीत गायले.

star pravah serial thipkyachi rangoli
star pravah serial thipkyachi rangoli

अप्पूला झालेले बाळ ती सुमी आणि निखीलकडे सुपूर्त करते पण आता ते बाळ अप्पूचच आहे याचा उलगडा सगळ्यांना झालेला पाहायला मिळणार आहे. या गोड शेवटानंतर मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. त्यामुळे बहुतेक प्रेक्षकांनी योग्य वेळी मालिका संपवली म्हणून कौतुक केले आहे. तर अभिनेते अतुल तोडणकर यांनी मालिकेच्या गमतीजमती शेअर करत कलाकारांमध्ये जुळलेल्या बॉंडिंगबद्दल एक छानशी पोस्ट लिहिली आहे. मालिकेला निरोप देताना अतुल तोडणकर म्हणतात की, ठिपक्यांची रांगोळी हि मालिका लवकरच रसिक प्रेक्षकांचा निरोप घेतेय. त्यानुसार मालिकेचं शूटिंगही संपलंय.. अगदी खरं आणि स्पष्ट सांगू… मी आमची मेकअप रूम खूप मिस करतोय. एकाच मेकअप रूममध्ये आम्ही ४ कलाकार एकत्र असायचो.. असं मी अजूनपर्यंत कधीच नाही केलंय… पण इथे ते घडवून आणलं…

thipkyachi rangoli serial exit
thipkyachi rangoli serial exit

ते आमच्यामध्ये असलेला भावनिक बंध अर्थात EMOTIONAL BONDING ने. एकमेकांकडून कसलीही अपेक्षा, फायदा घेण्याची वृत्ती, स्वार्थीपणा अशा कुठल्याही भावना नसताना ( जे हल्ली खूपच दुर्मिळ आहे )आम्ही चार बिंदू… हळू हळू चौकोन आणि हळूहळू वर्तुळ होत एकमेकांच्या कधी जवळ आलो आमचं आम्हालाच कळलं नाही.. मित्रांनो, हो…आता सह कलाकार नाही,… मित्र तुम्हाला खूप मिस करतोय आणि करेन. पुन्हा एकत्र काम करण्याचा योग लवकरच येऊ दे..मज्जा आली.. खूssssssप मज्जा आली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button