आज २५ डिसेंबरच्या मुहूर्तावर स्वानंदी टिकेकर आणि गौतमी देशपांडे या दोन्ही अभिनेत्री विवाहबंधनात अडकत आहेत. स्वानंदी टिकेकर आशिष कुलकर्णी सोबत साखरपुडा केल्यानंतर चर्चेत राहिली होती. तर गौतमीने मेंदी सोहळ्याच्याच दिवशी स्वानंद तेंडुलकर सोबत लग्न करत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आज या दोन्ही लग्नाला हजेरी लावण्यासाठी कलाकारांची मोठी धावपळ होताना दिसणार आहे. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाची गडबड सुरू झाली आहे. रमा राघव मालिका फेम अभिनेत्री सोनल पवार हिचा काल २४ डिसेंबर रोजी मेंदीचा सोहळा पार पडला आहे. येत्या २८ तारखेला सोनल पवार ही स्वप्नील पौलास्ते सोबत लग्न करत आहे. सोनल पावरच्या लग्नागोदरच्या विधींना आता नेमकीच सुरुवात झाली आहे.
दरम्यान मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांचा साखरपुडा पार पडला त्याच दिवशी सोनल पावरचा देखील साखरपुडा झाला होता. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोनलने साखरपुडा केला असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर लग्नाला काहीच दिवस शिल्लक आहेत हे लक्षात येताच मनात एक वेगळी धाकधूक निर्माण झाली आशय आशयाची एक पोस्ट तिने शेअर केली होती. सोनलने झी मराठी वरील तुला पाहते रे या मालिकेत नायिकेची मैत्रीण रुपालीची भूमिका साकारली होती. रमा राघव या मालिकेत तिने अश्विनीची भूमिका साकारली आहे. घाडगे अँड सून, सरस्वती, बॉस माझी लाडाची, लाडाची मी लेक गं, तुला पाहते रे अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेले आहे. सोनलचे बालपण आणि शिक्षण मुंबईतील बोरीवली मध्येच केले. तिचे शालेय शिक्षण सुविद्या प्रसारक संघ मंगूभाई दत्तानी विद्यालय, बोरीवली येथे झाले. तर फार्मसी पूर्ण केल्यानंतर ती लोटस हॉस्पिटल, मीरा रोड येथे फार्मासिस्ट म्हणून काम करत होती. त्यासोबत ती नाटकातूनही सक्रिय होती.
महाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रमातही ती सहभागी होत होती. झी मराठीवरील ‘अस्मिता’ या मराठी मालिकेतून तिला पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली होती. झी युवावरील शौर्य , झी मराठीवरील खुलता कळी खुलेना मालिकेसाठी तिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. फार्मासिस्ट असलेल्या सोनलला या प्रोफेशनल लाईफ पेक्षा अभिनय क्षेत्राची ओढ जास्त होती. त्यामुळे काही काळ फार्मासिस्ट म्हणून भूमिका बाजावल्यानंतर ती पूर्णवेळ अभिनेत्री म्हणून काम करू लागली. तर समीर पौलास्ते हा देखील मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहे. विठ्ठला तूच, वेगळी वाट, चंद्रमुखी , ये रे ये रे पावसा अशा चित्रपटासाठी त्याने मार्केटींगचे काम केले आहे.