marathi tadka

अशी दिसते राहा कपूर….रणबीर आणि आलियाची लेक प्रथमच कॅमेऱ्यासमोर

कलाकार हे नेहमीच आपल्या मुलांना मिडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. असाच काहीसा प्रयत्न विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या लेकीबाबत घेतला होता. पण एका मॅचदरम्यान अनुष्काने तिची लेक वामीकाला सोबत आणले होते तेव्हा तिचा चेहरा कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता. वामीका कशी दिसते हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक होते त्यामुळे तिचा तो व्हिडीओ खूप व्हायरल झाला. पण आपल्या लेकीच्या बाबतीत खूप सिक्युअर असणाऱ्या विराटने हात जोडून सोशल मीडियावरून तिचे व्हिडीओ आणि फोटो हटवण्यासाठी विनंती केली होती. तेव्हा विराटच्या या निर्णयाचे सगळ्यांनी स्वागत केले होते. असाच काहीसा प्रयत्न रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनीही आपल्या लेकीबाबत घेतला होता.

alia bhatt and ranbir kapoor daughter
alia bhatt and ranbir kapoor daughter

१४ एप्रिल २०२२ मध्ये त्या दोघांनी लग्न केले होते. आलिया भट्ट हिने गेल्या वर्षी ६ नोव्हेंबर २०२२ रोजी मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर आजतागायत या दोघांनीही त्यांच्या लेकीचा चेहरा मिडियापासून लपवून ठेवला होता. राहा हे आलिया आणि रणबिरकपूरच्या लेकीचे नाव आहे. गेल्या महिन्यात राहाचा वाढदिवस अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला होता. पण आज ख्रिसमसच्या निमित्ताने या दोघांनी आपल्या लेकीचे झलक लोकांसमोर आणलेली पाहायला मिळाली. आज आलिया आणि रणबीरने ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले आहे. यावेळी या दोघांनी राहाला मिडियासमोर आणले. राहाचा हा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर अल्पावधीतच व्हायरल झाला आहे.

raha kapoor ranbir and alia bhatt daughter
raha kapoor ranbir and alia bhatt daughter

सफेद रंगाच्या फ्रॉकमध्ये राहाचा क्यूटनेस सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा आहे. तिचे घारे डोळे तर खूपच बोलके असलेले जाणवले. नेटकऱ्यांनी राहाच्या निरागस सौंदर्याचे मोठे कौतुक केले आहे.काहींनी तिला राजकपूर यांच्यासारखी दिसते असे म्हटले आहे. राजकपूर यांचे फोटो राहासोबत जोडले जात आहेत. दोघांचेही डोळे अगदी सेमच असल्याने पणजोबांसारखी क्युट असलेली राहा याच मुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. राहा कशी दिसते या प्रश्नाचे उत्तर आता तिच्या या व्हीडीओमुळे चाहत्यांना कळले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button