news

जॉर्जिया नाही अरबाज खान करतोय या आर्टिस्ट सोबत लग्न…५६ व्या वर्षी पुन्हा चढणार बोहल्यावर

बॉलिवूड सृष्टीत सध्या अरबाज खानच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सलमान खानचा धाकटा भाऊ अरबाज खान ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज रविवारी २४ डिसेंबर २०२३ रोजी चर्चेत असलेली गर्लफ्रेंड शुरा खानसोबत लग्न करण्याच्या तयारीत आहे. अरबाजने अद्याप त्याच्या लग्नाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नसली तरी मीडिया माध्यमातून याच लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच अभिनेत्री रविना टंडनने मात्र अरबाजचे लग्न असल्याचे जाहीर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अरबाज सोबत एका पार्टीत रविना टंडनने गाण्याच्या तालावर ठेका धरला होता. लग्नागोदरच्या या पार्टीत अरबाजने त्याच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना आमंत्रण दिले होते.

arbaz khan and shaura khan wedding
arbaz khan and shaura khan wedding

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे. लग्नाच्या या बातमीनंतर अरबाज त्याचा भाऊ सलमान खान बहीण अर्पिता खानच्या मुंबईतील घरी पोहोचलेले दिसले. या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावलेली पाहायला मिळते. शुरा खान देखील त्याच ठिकाणी एका पारंपरिक वेशात दिसली आहे. या लग्नाला अरबाज खानचा मुलगा अरहान देखील स्पॉट झाला. दरम्यान सलमान खानने मात्र मीडियाला घरात प्रवेश करण्यापासून रोखले होते. सलमान अर्पिताच्या घरात जाताच त्याला सुरक्षा रक्षकांनी घेरले होते. अरबाज खान हा मलायका अरोरा सोबत घटस्फोट घेरल्यानंतर जॉर्जिया एंड्रियानीसोबत अनेकदा स्पॉट झाला तेव्हा तो जॉर्जियाला डेट करत असल्याचे बोलले जात होते. दरम्यान जॉर्जिया ही अरबाजच्याच एका फ्लॅटमध्ये राहत होती असेही सांगितले जात होते.

पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर अरबाज काही काळापासून मेकअप आर्टिस्ट शुरा खानला डेट करत असल्याची बातमी समोर आली. त्यामुळे आज त्यांच्या लग्नाचा सोहळा बहीण अर्पिता खानच्या घरी होणार हे दिसून आले. या लग्नाबाबत असेही सांगितले जाते की, अरबाज आणि शुरा या दोघांनी अचानकपणे लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि केवळ कुटुंबातील सदस्यांनीच या लग्नाला उपस्थित राहून ते मिडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. अरबाज आणि शूरा दोघेही त्यांच्या नात्याबद्दल कधीही जाहीरपणे बोलले नाहीत. मात्र लग्नाच्या या बातमीने हे लग्न अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडतंय हे आता समोर आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button