news

गौतमी आणि स्वानंदच्या हळदीला बहिणीचा थाट.. फोटो होत आहेत व्हायरल

अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर यांची लगीनघाई सुरू झालेली आहे. काल शनिवारी २३ डिसेंबर रोजी दोघांनी ‘लग्न करत आहोत’ असे सोशल मीडियावर जाहीर केले होते. तेव्हाच त्यांच्या लग्नागोदरच्या विधींना सुरुवात झाली होती. काल रात्री उशिरा गौतमीची मेंदी पार पडली. गौतमीच्या मेंदी सोहळ्यात बहीण मृण्मयीने खणाचा ड्रेस परिधान करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी गौतमी आणि स्वानंद यांच्या मेंदीचा सोहळा एकत्रितपणे पार पडला. तर आज काहीवेळापूर्वीच या दोघांची हळद साजरी करण्यात आली. हळदीच्या सोहळ्याचे काही खास क्षण गौतमीने आणि मृण्मयीने शेअर केलेले पाहायला मिळतात.

gautami deshpande and swanand wedding haladi
gautami deshpande and swanand wedding haladi

गौतमीच्या हळदीच्या सोहळ्यात पिवळ्या रंगांची थीम देण्यात आली होती त्यामुळे त्यांचे मित्रमंडळी आणि नातेवाईक पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये तिथे उपस्थित राहिले. गौतमी आणि स्वानंदचा हा लग्नसोहळा अगदी मोजक्याच मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. हळदीच्या सोहळ्यानंतर संगीत सोहळा पार पडेल असे सांगितले जात आहे. त्यामुळे संगीत सोहळ्यात गौतमीचा लूक कसा असणार याची जास्त उत्सुकता आहे. गौतमीसोबतच मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेत्री विवाहबद्ध होत आहे. ही अभिनेत्री आहे स्वानंदी टिकेकर. कालच स्वानंदीच्या मेंदीचा सोहळा पार पडला. आज तीची हळद पार पडणार असून उद्या २५ डिसेंबर रोजी गायक आशिष कुलकर्णी सोबत ती लग्न करणार आहे. त्यामुळे गौतमी सोबत स्वानंदीच्या लग्नाचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

gautami and swananad tendulkar wedding
gautami and swananad tendulkar wedding

गौतमीने तिच्या लग्नाची बातमी खूपच खाजगीत ठेवली होती. ही बातमी जाहीर करण्याअगोदर मृण्मयीने तिचे केळवण साजरे केले होते. काल मेंदीच्या सोहळ्यात आणि आज हळदीच्या सोहळ्यात मृण्मयीने खूप धमाल मस्ती केलेली पाहायला मिळाली. एरवी दोघी रडेपर्यंत भांडणाऱ्या या बहिणी आज मात्र लग्नाच्या सोहळ्यानिमित्त खूपच उत्साही पाहायला मिळाल्या. आपल्या बहिणीच्या लग्नातली ही मजा मस्ती आणि त्यातला आनंद मृण्मयी पुरेपूर लुटताना पाहायला मिळत आहे. आता उत्सुकता आहे ती गौतमी आणि स्वानंदीच्या लग्नसोहळ्याची.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button