news

सिंधुताईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात… या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत नुकताच झाला साखरपुडा

सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहे अनेक मराठी अभिनेते आणि अभिनेत्री लग्न बंधनात अडकताना पाहायला मिळत आहेत. अश्यातच सिंधुताईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार हिने अभिनेता अंबर गणपुळे ह्यांच्यासोबत आज नुकताच साखरपुडा उरकला आहे. आज गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ह्यांनी फोटो शेअर करत हि आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेता अंबर गणपुळे ह्याला तुम्ही कदाचित ओळखल नसेल. लोकमान्य मालिकेत त्याने गोपाळ गणेश आगरकर ह्याची भूमिका उत्तमपणे वठवली होती. तसेच अंबरने स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा यात महत्वाची भूमिका साकारली होती. कार्तिकचा भाऊ आदित्य ही भूमिका त्याने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वठवली होती.

actor ambar ganpule in lokmanya serial
actor ambar ganpule in lokmanya serial

अंबर बऱ्याच वर्षांपासून पुण्यातच वास्तव्यास असून सिम्बॉईसीस कॉलेजमधून त्याने शिक्षण घेतले आहे. यासोबतच हॉटेल मॅनेजमेंटचे देखील त्याने प्रशिक्षण घेतले होते. मात्र अभिनयाची ओढ त्याला मालिका सृष्टीत घेऊन आली. ती फुलराणी या मालिकेत अंबर महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. त्यानंतर लहान मोठ्या ऍडफिल्मसाठी त्याने काम करण्यास सुरुवात केली. रंग माझा वेगळा या मालिकेमुळे अंबर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. त्यांनतर लोकमान्य मालिकेतील आगरकरांची भूमिका त्याने उत्तम निभावली होती. तर अभिनेत्री शिवानीची सिंधुताईंच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली सध्या तिची भूमिका असलेली सिंधुताई माझी माय हि मालिका चांगलीच चर्चेत आहे. शिवानी सोनार हिने कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेत देखील प्रमुख भूमिका साकारली होती. कधी गोड़ तर कधी कठोर भूमिका करण्यात करण्यात सोनाली सोनार हीच हातखंड आहे असे म्हणायला हरकत नाही.

shivani sonar in sindhutai serial
shivani sonar in sindhutai serial

अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे यांचं हे लव्ह मॅरेज असणार आहे मात्र ह्या दोघांची ओळख कशी झाली आणि हे कधी प्रेमात पडले ह्याची चुमुकदेखील कोणाला लागली नाही हे विशेष. आज व्हायरल होत असलेल्या त्यांच्या लग्नाच्या साखरपुड्याचे फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसला आहे. मालिकेत दोघेही उत्तम भूमिका साकारणारे हे कलाकार सोशल मीडियावर देखील तितकेच ऍक्टिव्ह असलेले पाहायला मिळतात. अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे याना साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button