news

हक्काच्या घरानंतर अभिनेत्रीची आणखी एक स्वप्नपूर्ती साकार…कारची किंमत ऐकून अवाक व्हाल

स्वतःच्या हक्काचं घर आणि गाडी असली की सामान्य माणसाची स्वप्न पूर्ण होतात असे म्हटले जाते. कलाकारांच्या बाबतीतही तसेच काहीसे म्हणावे लागेल. मोठा स्ट्रगल करत भाड्याच्या घरात कित्येक वर्षे काढल्यानंतर आपलंही हक्काचं घर असावं असं स्वप्न कित्येक कलाकारांनी पाहिलं आहे आणि ते सत्यात देखील उतरवलं आहे. गेल्याच वर्षात स्वराज्यरक्षक संभाजी मालिकाफेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने तिचं हक्काचं घर खरेदी केलं होतं. त्यापाठोपाठ आता प्राजक्ताची आणखी एक स्वप्नपूर्ती साकार झालेली पाहायला मिळत आहे. काल गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर प्राजक्ताने महागडी ह्युंदाई ब्रँडची (Hyundai Tucson facelift) ही जवळपास ३२ ते ३६ लाख रुपयांची गाडी (टॉप मॉडेल) खरेदी करून हा आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

prajakta mali buy a new car
prajakta gaikwad buy a new car

त्यावर सेलिब्रिटींनी तसेच चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. प्राजक्ता गायकवाड ही लवकरच दाक्षिणात्य चित्रपटातून प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. गेल्याच वर्षात तिने जवळपास दोन प्रोजेक्ट कम्प्लिट केले होते. शिक्षण आणि अभिनय अशी तारेवरची कसरत करत प्राजक्ता तिच्या स्वप्नांचा पाठलाग करत आहे. खूप कमी वयात यश मिळालेल्या अभिनेत्रींपैकी ती एक मानली जात आहे. कारण एवढ्या कमी वयात आणि एवढ्या कमी कालावधीत घर घेणं आणि आलिशान गाडी खरेदी करणं ही स्वप्न क्वचितच कोणी सत्यात उतरवताना दिसली आहेत. नांदा सौख्य भरे या मालिकेतून प्राजक्ताची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली होती.

prajakta mali new car Hyundai Tucson facelift
prajakta mali new car Hyundai Tucson facelift

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून तिने साकारलेली येसूबाईची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या भूमिकेने प्राजक्ताला मोठा मानसन्मान मिळवून दिला आहे. महानाट्य, चित्रपट अशी तिची यशाची घोडदौड सुरूच आहे. अल्पावधीतच यश मिळवलेली अभिनेत्री अशी तिने आता स्वतःची ओळख बनवली आहे. त्यामुळे तिचे चाहत्यांकडून नेहमीच कौतुक होत असते. सोज्वळ स्वभावाची अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या ह्या स्वप्नपूर्तीसाठी आमच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button