news

“माझ्याकडे १ सिक्रेट आहे” म्हणत परीने सांगितली खुशखबर… माझी तुझी रेशीमगाठ फेम मायराच्या परिवारावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली परी म्हणजेच मायरा वायकुळ हिने आता मोठी ताई बनणार असल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘माझ्याकडे एक सिक्रेट आहे ?’…’मी आता मोठी ताई होणार आहे’…’सप्टेंबर २०२४’…असे म्हणत मायराच्या आई वडिलांनी हे खास फोटोशूटच्या केले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात श्वेता वायकुळ आणि गौरव वायकुळ यांना दुसरे अपत्य होणार आहे. त्यामुळे मोठी ताई म्हणून मायरा आतापासूनच तिचा तोरा मिरवू लागली आहे. अर्थात या आनंदाच्या बातमीने एकट्या मायराच्या जोडीला भावंडाची साथ तिला मिळणार आहे त्यामुळे मायरा खूपच खुश झाली आहे. मायरा ही श्वेता वायकुळ आणि गौरव वायकुळ या दाम्पत्याची लेक आहे.

myra waikul family photo
myra waikul family photo

मायरा लहान असतानाच श्वेता वायकुळ यांनी तिचे माजमस्ती करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. अल्पावधीतच तिच्या या व्हिडिओजना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला. एक्सप्रेशन क्वीन अशी तिची ओळख बनू लागली होती. एवढ्या कमी वयातच मायराचा सोशल मीडियावर चांगला फॅनफॉलोअर्स तयार झाला होता. याचाच फायदा म्हणून मायराला अभिनय क्षेत्रात येण्याची संधी मिळाली. झी मराठीच्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून मायराचे छोट्या पडद्यावर पदार्पण झाले. यानंतर मायरा काही गाण्यांमध्ये तसेच नीरजा या हिंदी मालिकेत सुद्धा झळकली. तर लवकरच तिचा मुक्ता बर्वे सोबत असलेला नाच गं घुमा हा चित्रपट १ मे राजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाच गं घुमा या चित्रपटात मायरा मुक्ता बर्वेच्या मुलीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मायराने एक खास मुलाखत दिली आहे. ती तिचे फ्युचर प्लॅन्स सांगताना खूपच फॉरवर्ड पाहायला मिळाली आहे.

im going to be a big sister myra waikul
im going to be a big sister myra waikul

आता जर देवाची इच्छा असेल तर मी पुढे जाऊन अभिनय क्षेत्रात नक्कीच यश मिळवेल आणि त्यांच्या जोडीला मी माझ्या वडिलांचा बिजनेस देखील सांभाळणार आहे असेही ती तिच्या भविष्याबद्दल सांगते. दरम्यान मायराच्या नावाने तिची आई श्वेता वायकुळ यांनी ज्वेलरीचा बिजनेस सुरू केला होता. तर गौरव वायकुळ यांचाही स्वतःचा मोठा बिजनेस आहे. मायराची आजी टाइम्स ऑफ इंडिया साठी काम करतात. मायराची आतापासूनच जडणघडण करण्यात आई श्वेता वायकुळ यांचा मोठा हातभार आहे. आता दुसऱ्या अपत्याच्या आगमनाच्या चाहुलीने त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी येऊन पडणार आहे. आज गुढी पाडव्याचे औचित्य साधून वायकुळ कुटुंबाने त्यांचा हा आनंद सोशल मीडियावर शेअर करताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button