serials

हा आहे शिवाचा रिअल लाईफ पार्टनर …मराठी इंडस्ट्रीशी आहे जवळचा संबंध

सध्या मालिका सृष्टीत लग्नाचे वारे वाहू लागले आहेत अशातच झी मराठीच्या शिवा या मालिकेत देखील आशु आणि दिव्याच्या लग्नाचा घाट पाहायला मिळाला. पण दिव्या पळून गेल्याने आता आशुसोबत शिवाचे लग्न होत असल्याने मालिकेला एक निर्णायक ट्विस्ट मिळाला आहे. शिवाचे आशुवर प्रेम असते पण बहिणीखातर ती गप्प असते. पण आता दिव्या पळून गेल्याने दोघांच्याही घरच्यांनी आता आशुचे शिवा सोबत लग्न लावले आहे. शाल्व किंजवडेकर आणि पूर्वा कौशिक यांच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. पुरावा कौशिक हिच्या अभिनयाचही मोठं कौतुक केलं जात आहे. यानिमित्ताने पूर्वा कौशिक हिच्या खाजगी आयुष्याबद्दल थोडं जाणून घेऊयात.

purva kaushik husband amogh phadke
purva kaushik husband amogh phadke

साधारण पाच वर्षांपूर्वीच अभिनेत्री पूर्वा कैशिक हिचे लग्न झालेले आहे. पूर्वा फडके या नावानेही ती ओळखली जाते. पूर्वाने अनेक नाटकातून काम केले होते. पण अजूनही बरसात आहे या मालिकेने तिला प्रसिद्धीच्या झोतात आणले. सहाय्यक भूमिकेत झळकणारी पूर्वा प्रथमच शिवा मालिकेतून नायिकेची भूमिका साकारू लागली. विशेष म्हणजे या मालिकेतील भूमिकेसाठी तिने केसही कापले आहेत. तिच्या या डेडीकेशनचंही तेवढंच कौतुक पाहायला मिळतं. पुर्वाने इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या अमोघ फडके सोबत लग्न केले आहे.

shiva serial actress purva phadke husband amogh phadke
shiva serial actress purva phadke husband amogh phadke

अमोघ हा प्रकाशयोजनाकार म्हणून या इंडस्ट्रीत काम करतो. जन्मवारी, जर तरची गोष्ट या आणि अशा कितीतरी नाटकांसाठी त्याने प्रकाशयोजनाकार म्हणून काम केलेले आहे. जन्मवारी या नाटकासाठी त्याला सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार म्हणून झी नाट्यगौरवचा पुरस्कार मिळाला होता. अमोघ आणि पूर्वाचे एकत्रित फोटो ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या चाहत्यापैकी बऱ्याच जणांना तिचं लग्न झालंय हे माहीत नाहीये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button