महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने अनेख नवख्या कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात आणले. ओंकार भोजने हा कोकणचा कोहिनुर त्यातलाच एक म्हणावा लागेल. पण ओंकारने जसा या शोमधून काढता पाय घेतला तो पुन्हा न परतण्यासाठीच का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण ओंकारचे चाहते अजूनही तो या शोमध्ये यावा म्हणून वाट पाहत आहेत. ओंकार भोजनेशिवाय महाराष्ट्राची हास्यजत्रा अधुरी आहे असे मत प्रेक्षक नेहमी व्यक्त करत असतात. नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, वनिता खरात यांच्यासोबतच्या त्याच्या प्रहसनाला तुफान प्रतिसाद मिळत असे. ओंकार नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावताना दिसला त्यावेळी त्याचे ‘तू दूर का…तू मजबूर का’..हे त्याचं गाजलेलं गाणं ऐकताच जवळच उभ्या आलेल्या नम्रताला मात्र तिचे अश्रू अनावर झाले.
ओंकार भोजन, नम्रता संभेराव आणि वनिता खरात यांचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे लेखन प्रसाद खांडेकर याने केलेले आहे.या चित्रपटात या तिघांसह सायली शिंदे, तेजस्विनी पंडित, भाऊ कदम, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे, सुशील इनामदार, रोहित माने हे कलाकार झळकणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त ओंकार, नम्रता आणि वनिता मुंबईच्या रुईया कॉलेजच्या ‘द मिक चेक’ सोहळ्यात उपस्थित राहिले होते. त्यावेळी ओंकारने ‘ तू दूर का…’ हे गाणं गाऊन उपस्थितांची मनं जिंकून घेतली. मात्र जवळच उभ्या असलेल्या नम्रताला मात्र ओंकारच्या या ओळी ऐकून रडायला आले. डोळ्यातले अश्रू पुसत नम्रता ओंकारचे गाणे मन लावून ऐकत होती.
तिच्या या कृतीमुळे नम्रता ओंकारला हास्यजत्रा मध्ये मिस तर करत नाही ना अशी चर्चा पाहायला मिळते आहे. हास्यजत्राच्या मंचावर ओंकार आणि नम्रताचे छान बॉंडिंग जुळलेले होते. आई आणि मुलाचे स्किट सादर करत असताना ही आई तिच्या मुलाच्या नेहमी पाठीशी उभी असायची. या आठवणी दाटून आल्यामुळेच नम्रताला तिचे अश्रू अनावर झाले असे म्हटले जात आहे. नम्रता भावुक होते आणि डोळे पुसत ती ओंकारचे गाणे संपताच त्याला मिठी मारते. त्यांचे बॉंडिंग पाहून उपस्थितांनाही भावुक व्हायला होतं. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी ओंकार भोजनेला पुन्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये आणावे अशी मागणी केली आहे.