news

माझा विश्वासच बसेना एवढी अनास्था वाढून दिली याचं वाईट वाटलं…फोटो शेअर करत मुक्ता बर्वेने केला वाईट अनुभव शेअर

अभिनेत्री मुक्ता बर्वे सध्या तिच्या चारचौघी या नाटकाच्या दौऱ्यांमध्ये व्यस्त आहे. आज संध्याकाळी ५ वाजता नाशिकमध्ये तिच्या नाटकाचा प्रयोग होणार आहे. यामुळे मुक्ता बर्वे भूक लागल्यामुळे एका स्नॅक्स सेंटरला थांबली. मुक्ता अनेकदा या स्नॅक्स सेंटरला भेट देत असते मात्र आजचा तिचा हा अनुभव खूपच निराशाजनक राहिला आहे. आपल्या आवडीचे पोहे खायला मिळतील या उद्देशाने मुक्ता बर्वे श्री दत्त स्नॅक्स येथे गेली होती. तिने पोह्यांची ऑर्डर दिली मात्र समोर असलेल्या प्लेटमधील पोहे पाहून कोणीतरी उगाचच अनास्था वाढून दिली याची तीला जाणीव झाली. या पोह्यांच्या प्लेटचा एक फोटो मुक्ता तिच्या फेसबुकवरील अकाउंटवर शेअर करते.

actress mukta barve photos
actress mukta barve photos

या अविश्वसनीय अनुभवाबद्दल मुक्ता म्हणते की, माझा विश्वासच बसेना! खरं तर मी ‘श्री दत्त स्नॅक्स’ ची फॅन आहे. मुंबई-पुणे करताना अनेकदा तिथे आवर्जून खाण्याचा ब्रेक घेते मी. आज नाशिक ला जाताना पडघा टोल नंतर खूप कौतुकानी थांबले आणि पोहे मागवले. अत्यंत अनास्थेनी , गरम असल्याचा भास होईल एवढेच जेमतेम गरम पोहे त्यांनी दिले. आणि कमिटमेंट एवढी की पोहे म्हणजे फक्त पोहे. कांदा-मीठ आणि साखर बास! जरा चव यावी म्हणुन कदाचित शेंगदाणे, शेव, कोथिंबीर, गेलाबाजार लिंबू .. यातलं काहिच नाही. पैसे वाया गेल्याच्या दुःखापेक्षा भूक लागलेली असताना समोरच्या डीश मधे कोणीतरी एवढी अनास्था वाढुन दिली याचं वाईट वाटलं.” दरम्यान मुक्ताने शेअर केलेला हा अनुभव पाहून तिच्या चाहत्यांनी देखील आपल्यालाही असाच अनुभव आलाय अशी प्रतिक्रिया दिली आहे.

mukta barve in shree datt snacks pohe
mukta barve in shree datt snacks pohe

श्री दत्त स्नॅक्सने जेव्हापासून फ्रेंचाईजि देण्यास सुरुवात केली आहे तेव्हापासून त्यांच्या पदार्थांच्या चवीमध्ये फरक जाणवू लागला आहे. आम्हालाही असेच बेचव पोहे खायला लागले होते असे मत व्यक्त करण्यात येत आहे. पोहे म्हणजे फक्त पोहे आहेत त्यात असणारे जिन्नस जवळजवळ गायबच आहेत. जेव्हा तुमचं नाव मोठं होतं तेव्हा त्याची गुणवत्ता देखील राखली जावी यावर विचार करणे गरजेचे आहे. मुक्ताने ही पोस्ट शेअर करताना श्री दत्त स्नॅक्सला देखील टॅग केले आहे. आणि या निराशेवर ठोस पावले उचलली जावीत अशी तिने अपेक्षा व्यक्त केली आहे. मुक्ता कधी सहसा अशा गोष्टी बोलून दाखवत नाही पण तिला खटकणारी गोष्ट आज तिने जाहीररीत्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button