marathi tadka

नाळ २ चित्रपटाचा टीझर लॉंच व्हिडिओ होतोय व्हायरल …. हे कलाकार पाहायला मिळणार नव्या चित्रपटात

नागराज मंजुळे नेहमी एका वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतात. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून विशेष लोकप्रियता मिळत असते.. नुकतेच त्यांनी त्यांच्या गाजलेल्या चित्रपटाच्या सिकवलची घोषणा केली आहे. खरं तर सैराटचा सिकवल यावा अशी तमाम प्रेक्षकांची मागणी आहे मात्र तूर्तास तरी या चित्रपटाचा सिकवल मी आणणार नाही आई स्पष्टीकरण नागराज मंजुळे यांनी दिले होते. त्यामुळे हा दुसरा सिकवल असणारा त्यांचा गाजलेला चित्रपट आहे नाळ. ” नाळ – भाग २” असे म्हणत नागराज मंजुळे यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची एक झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे ज्यात चिमुरडा चैत्या आता मोठा झाला असला तरी एसटीमध्ये बसून तो निसर्गाचा आस्वाद घेताना दिसत आहे.

naal 2 movie photos
naal 2 movie photos

हाच चिमुरडा चैत्या म्हणजेच बालकलाकार श्रीनिवास पोकळे आता तुम्हाला मोठा झालेला पाहायला मिळणार आहे. श्रीनिवास पुन्हा एकदा नाळ भाग २ चित्रपटाचा महत्वाचा भाग असणार आहे. त्यामुळे या सिकवलची घोषणा करताच प्रेक्षकांनी या चित्रपटाचे स्वागत केलेले पाहायला मिळत आहे. नाळ भाग दोन हा चित्रपट येत्या दिवाळीला म्हणजेच १० नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओज आणि आटपाट प्रस्तुत नागराज मंजुळे यांच्या याही चित्रपटाचे दिग्दर्शन पुन्हा एकदा सुधाकर रेड्डी यंक्कटी यांनी केले आहे. नाळ चित्रपटाचे दिग्दर्शन देखील सुधाकर यांनीच केले होते. नदीच्या पलीकडे असलेल्या आणि भीषण दुष्काळाची झळ पोहोचलेल्या गावाचे चित्र आता या सिकवलमध्ये बदलण्यात आले आहे. हिरवीगार झाडी, डोंगर आणि पाऊस अशा निसर्गाचे दर्शन घडणाऱ्या नाळ २ चित्रपटात तुम्हाला वेगळे काय पाहायला मिळणार याची जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे.

चैत्या याही वेळेला त्याच्या जन्मदात्या आईला भेटणार का ? याचा उलगडा या चित्रपटातून होईल अशी अपेक्षा आहे. याही चित्रपटात तो नागराज मंजुळे आणि देविका दफतरदार सोबत काम करताना दिसणार आहे. २०१८ नंतर श्रीनिवास पोकळेने काही मोजके चित्रपट केले. या एवढ्या वर्षाच्या कालावधीनंतर श्रीनिवास आता बराच मोठा दिसायला लागला आहे. नाळ २ चित्रपटासाठी त्याची निवड झाली तेव्हा श्रीनिवास खूपच खुश झाला होता. मधल्या काळात तो संत गजानन शेगावीचे या मालिकेत एका छोट्याशा भूमिकेत दिसला होता. त्यामुळे श्रीनिवास पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकून घ्यायला सज्ज झालेला आहे. नागराज मंजुळे यांच्या सोबत देविका दफ्तादार, दीप्ती देवी, चैत्या मामा ओम भुतकर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटासाठी श्रीनिवास पोकळे याला शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button