marathi tadka

पुण्याच्या तरुणीचा अमेरिकेत डंका… सर्वात यशस्वी उद्योजिका फोर्ब्सच्या यादीत संपत्तीचा आकडा पाहून डोळे चक्रावतील

नोकरी करण्यापेक्षा उद्योजक व्हा असं बोललं जातं. पण मराठी माणूस व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की दोन पाऊलं मागे हटतो. एकतर सुरुवातीलाच मिळणारे अपयश त्याला नको असते आणि महत्वाचं म्हणजे भांडवल उभं करण्यासाठी पुरेसे पाठबळ नसते. पण या दोन गोष्टींवर मात करत पुण्याच्या तरुणीने चक्क अमेरिकेतील सर्वात यशस्वी उद्योजिकामध्ये डंका गाजवला आहे. ही तरुणी आहे नेहा नारखेडे. नेहा नारखेडे हिचे बालपण पुण्यातच गेले. नेहाचे वडील तिला चांगली पुस्तकं आणून देत. यातून इंदिरा गांधी, किरण बेदी, इंद्रायणी नुरी अशा मोठ्या हुद्द्यावर असलेल्या आणि कर्तृत्ववान महिलांचा प्रवास तिला जाणून घेण्याची संधी मिळाली. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून तिने इंजिनिअरिंगची पदवी घेतली.

neha chandrakant narkhede
neha chandrakant narkhede

२००६ साली मास्टर्सची डिग्री घेण्यासाठी नेहा अमेरिकेत गेली. जॉर्जिया टेकमधून तिने ही पदवी मिळवली. शिक्षण झाल्यानंतर नेहाने काही काळ आयटी क्षेत्रात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणून नोकरी केली. पण त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन २०१४ साली तिने दोन साथीदारांसह स्वतःची कॉन्फ्लुइंट नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीतून वेगवेगळ्या कंपन्यांना डेटा प्रोसेस करण्यासाठी मदत होऊ लागली. या कंपनीचे मूल्य ९.१ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकं आहे म्हणजेच भारतीय चलनानुसार ही किंमत ७५ हजार कोटी इतकी आहे अल्पावधीतच तिच्या या कंपनीला मोठे यश मिळाले. याच कंपनीवर अवलंबून न राहता आणि एवढ्यावर समाधानी न राहता २०२१ साली नेहाने कॉन्फ्लुइंट सोबतच ऑसीलर नावाची दुसरी कंपनी सुरू केली. या कंपनीतून ऑनलाइन फसवणूक उघडकीस आणण्याचे काम केले जाऊ लागले. यासाठी तिने १६० कोटींची गुंतवणूक केली. आता नेहा या कंपनीची सीईओ आहे.

neha narkhede business women
neha narkhede business women

नेहा सध्या अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामधील पालो अल्टो येथे वास्तव्यास आहे. सचिन कुलकर्णी सोबत तिने लग्नगाठ बांधली. सचिन कुलकर्णी हा अमेरिकेतील चॅरिटी ट्रस्ट द्वारे भारतात शाळा उभारतो. आदिवासी समाजातील वंचित मुलांसाठी शाळा उभारण्याचे तो काम करत आहे. अरुणाचल प्रदेश राज्यात शाळा बांधण्यासाठी त्याने १५ हजार डॉलर्स खर्च केले होते. सेवा इंटरनॅशनल यूएसएकडे भारताच्या झारखंड राज्यात शाळा बांधण्यासाठी त्याने आणखी काही देणगी मागतली आहे. तर एकीकडे नेहा देखील परदेशात राहून यशस्वी उद्योजिका बनण्याचा मान पटकावत आहे. अमेरिकेतील सर्वात यशस्वी १०० महिला उद्योजिकांच्या फोर्ब्सच्या यादीत नेहाने ५० व्या स्थानावर स्वतःचे नाव गोवले आहे. नेहाची एकूण संपत्ती ४२९० कोटी इतकी आहे. सामाजिक बांधिलकी जपत हे दाम्पत्य भारतातील गरीब मुलांसाठी शाळा बांधण्याचे काम करत आहेत. आदिवासी मुलांसाठी अशा १०० शाळा उभारण्याचा त्यांचा मानस आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button