serials

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत अंतराची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीला ओळखलंत … प्रेमाची गोष्ट मालिकेत केलं होत काम

झी मराठी वाहिनीवर ‘नवरी मिळे हिटलरला’ ही नवीन मालिका प्रसारित झाली आहे. मालिकेतला नायक एजे म्हणजेच अभिराम जहागीरदार हा एक डिसीप्लिन व्यक्ती दाखवला आहे. सगळं काही परफेक्ट असावा असा त्याचा अट्टाहास असतो. त्यामुळे त्याच्या हॉटेलमध्ये आलेल्या खवय्यांना पदार्थाची टेस्ट बिघडली म्हणून स्वतः बनवून खाऊ घालताना दिसतो. अर्थात हे सगळं करत असताना त्याच्या मनात दडलेला एक हळवा कोपराही प्रेक्षकांना पाहायला मिळाला. अभिराम आणि लीलाची नोकझोक प्रेक्षकांनी पहिल्याच एपिसोड मध्ये अनुभवली. याच जोडीला अभिरामचे पूर्वायुष्यात घडलेल्या गोष्टींना जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. अंतरा ही त्याच्या आयुष्यात आलेली अशी व्यक्ती आहे जीचं तो सगळं काही ऐकत असतो.

navari mile hitlerla serial actor and actress name
navari mile hitlerla serial actor and actress name

पण आता अंतराचं शेवटचं पत्र मिळवण्यासाठी तो धडपड करताना पाहायला मिळणार आहे. जे शेवटचं पत्र चुकून लीला कडे जातं त्यामुळे अभिराम ते पत्र मिळवण्यासाठी लीलाचा पाठलाग करतो. ह्या पत्रात नेमकं काय दडलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहेच मात्र अंतराची भूमिका कोणी साकारली हेही प्रेक्षकांना जाणून घ्यायचे आहे. तर आज अंतराची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. नवरी मिळे हिटलरला या मालिकेला भलीमोठी स्टार कास्ट लाभली आहे. राकेश बापट आणि वल्लरी विराज हे दोघे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर अंतराचे पात्र देखील तेवढेच महत्वाचे मानले जात आहे. ही भूमिका अभिनेत्री माधुरी भारती हिने साकारली आहे. माधुरी भारती ही गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. एक अभिनेत्री, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, निवेदिका म्हणून तिने या क्षेत्रात स्वतःची ओळख बनवली आहे. चांदणे शिंपित जाशी, लग्नाची बेडी, धडकन जिंदगी की, फास, मुक्ती, पुनश्च हरी ओम, बोन्साय, दहा बाय दहा अशा हिंदी मराठी मालिका, लघुपट, नाटक तसेच जाहिरातींमधून माधुरीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.

Madhuri Bharati in navri mile hitlerla
Madhuri Bharati in navri mile hitlerla

स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत तिने तेजश्री प्रधानची बहीण मंजिरीची भूमिका साकारली आहे. प्रेमाची गोष्ट, लग्नाची बेडी या मालिकेमुळे माधुरी भारती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. माधुरी ही मूळची संभाजीनगरची. नाट्यशास्त्र विभागातून अभिनयाचे धडे गिरवत असताना तिला ज्येष्ठ अभिनेते दिलीप घारे यांच्याकडून मार्गदर्शन मिळत गेले. एकांकिका, आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धा, व्यवसायिक नाटक असा तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. मधल्या काळात काही चॅनल्ससाठी तिने क्रिएटिव्ह हेड म्हणून काम केले.फास चित्रपटातून तिला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. आता माधुरीने मालिका सृष्टीत चांगला जम बसवलेला पाहायला मिळतो आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेसोबतच ती आता झी मराठी वाहिनीच्या नवरी मिळे हिटलरला मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. अजून तिची या मालिकेत एन्ट्री झाली नसली तरी अभिराम आणि अंतराचा भूतकाळ जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button