serials

या मराठमोळ्या बालकलाकाराला ओळखलं… मुंजाची छप्परफ़ाड कमाई पैशांचा पडलाय अक्षरश पाऊस

७ जून रोजी प्रदर्शित झालेला मुंजा हा बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवत आहे. चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी कथानकाचे आणि त्यातील कलाकारांचे मोठे कौतुक केले आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर ४ कोटी २१ लाखांची कमाई केली. तर काल शनिवारी चित्रपटाला भरगोस प्रतिसाद मिळाला असून या एका दिवसात ७ कोटी ४० लाखांची कमाई करत यशाचा टप्पा गाठलेला पाहायला मिळाला. दरम्यान दोनच दिवसात मुंजा चित्रपटाने तब्बल ११ कोटी ६१ लाखांची कमाई केली आहे. तर आज रविवारी देखील हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. मुंजा चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. या चित्रपटात बरेचसे मराठी कलाकार झळकले आहेत.

actor aayush ulgade in munja film
actor aayush ulgade in munja film

त्यामुळे हा चित्रपट मराठी कलाकारांचा चित्रपट म्हणून ओळख मिरवत आहे. शर्वरी वाघ, सुहास जोशी, भाग्यश्री लिमये, रसिका वेंगुर्लेकर, अनय कामत, अजय पूरकर, बालकलाकार खुशी हजारे या मराठी कलाकारांसह मुंजाची मुख्य भूमिका बालकलाकार आयुष उलगडे याने निभावली आहे. मुंजा म्हणजेच गोट्याच्या भूमिकेसाठी आयुषची सुरुवातीला लुकटेस्ट घेण्यात आली तेव्हा त्याची या भूमिकेसाठी निवड करण्यात झाली. आयुषने ही भूमिका अतिशय उत्तम निभावली असल्याचे दिसून येते. गोट्या हा मुलगा वयाने मोठ्या असलेल्या मुन्नीसोबत एकतर्फी प्रेम करत असतो. त्याचं हे वागणं त्याच्या घरच्यांना पटत नसतं. पण अघोरी कृत्य करून गोट्या काळी जादू करतो आणि यातच त्याला जीव गमवावा लागतो. पण तब्बल ७० वर्षाने तो पुन्हा एका वेगळ्या रुपात येऊन मुन्नीला शोधायला येतो. त्याचा हा शोध कसा पूर्ण होतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

aayush ulgade in indrayani serial
aayush ulgade in indrayani serial

आयुषच्या या अभिनयाला तोड नाही असेच पाहणाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचा हा सहजसुंदर अभिनय प्रेक्षकांनी मालिकेत देखील अनुभवला आहे. राजा राणीची गं जोडी, इंद्रायणी, ढ लेकाचा, संत गजानन शेगावीचे, दख्खनचा राजा ज्योतिबा, अधाशी अशा अनेक कलाकृतीतून तो महत्वपूर्ण भूमिकेत झळकला आहे. कोल्हापूरच्या शिंदे थिएटर अकॅडमीमधून आयुषने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. आयुषने मराठी मालिकासृष्टीत चांगला जम बसवला असून मुंजा चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्येही ओळख मिळाली आहे. मुंजाच्या भूमिकेसाठी त्याच्या अभिनयाचं सर्वच स्तरातून मोठं कौतुक होत आहे. त्यामुळे सध्या तो मोठ्या पडद्यावरचा स्टार बनला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button