
सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर दोघेही लग्न कधी करणार असे त्यांच्या चाहत्यांना झाले होते. मात्र आता लवकरच त्यांची लग्नघटिका जवळ आलेली पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुग्धा आणि प्रथमेशच्या केळवणाचा थाट त्यांच्या नातेवाईकांच्या घरी सजलेला पाहायला मिळाला होता. मुग्धा सोबत तीची बहीण मृदुला वैशंपायन हिच्याही लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे गेल्या महिन्यात या दोघांनी अतिशय साधेपणाने साखरपुडा केलेला पाहायला मिळाला. तर मुग्धाची बहीण मृदुल हिने विश्वजित जोगळेकर सोबत मोठ्या थाटात लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली.

बहिणीच्या लग्नातील फोटो देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळाले. पण आता मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाची घटिका समीप आलेली आहे. बहिणीच्या लग्नानंतर आता मुग्धाच्या घरात पुन्हा सनई चौघडे वाजताना पाहायला मिळणार आहेत. आज या दोघांचाही हळदीचा समारंभ पार पडलेला आहे. प्रथमेश आणि मुग्धा यांनी एकत्रितपणे हळदीचा सोहळा साजरा न करता आपापल्या घरी हा सोहळा साजरा केला आहे. हळदीचे काही खास फोटोज ह्या दोघांनीही आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेले पाहायला मिळत आहेत.

उद्या गुरुवार २१ डिसेंबर रोजी ह्या दोघांचं लग्न लागणार असून लग्नात अनेक कलाकार आणि गायक मंडळी हजेरी लावताना पाहायला मिळणार आहेत. मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे ह्यांचं हे लग्न विशेष मानलं जात. अनेक दिवस एकमेकांसोबत महाराष्ट्रभर आपल्या गायनातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ह्या जोडप्याला अनेक चाहते आशीर्वाद देताना पाहायला मिळत आहेत.