काल माझा मुलगा शाळेतून घरी आला ती गोष्ट सांगताना तो थरथरत होता… शाळेत का पाठवता मग मुलाला बदला शाळा असे उपाय
मुलांची व्यवस्थित जडणघडण व्हावी त्यांची बौद्धिक क्षमता वाढावी, काय चूक काय बरोबर हे समजावे यासाठी त्यांच्यावर शाळेत, समाजात, कुटुंबाकडून संस्कार घडवण्यात येत असतात. त्यांच्या बालमनावर जे तुम्ही रुजवाल तसेच विचार त्यांच्यातून उत्पन्न होत असतात. त्यासाठी शाळा हा एक प्रभावी घटक मानला जातो. पण शाळेतच तुम्हाला भेदभावाच्या गोष्टी शिकवण्यात येत असतील तर त्याचा परिणाम हा त्यांच्या बालमनावर नक्कीच होतो. असाच काहीसा धक्कादायक अनुभव मराठी मालिका दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांनी घेतला आहे. वीरेंद्र प्रधान यांनी उंच माझा झोका, यशोदा गोष्ट श्यामच्या आईची, राधा प्रेम रंगी रंगली, वहिनीसाहेब , या सुखानो या, स्वामिनी अशा दर्जेदार मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. सोशल मीडियावर वीरेंद्र प्रधान यांनी आपल्या मुलाचा एक धक्कादायक अनुभव सगळ्यांसोबत शेअर केला आहे. या अनुभवाबद्दल ते म्हणतात की, नमस्कार . काल माझा मुलगा शाळेतून घरी आला तो अस्वस्थ होऊनच . आल्या आल्या त्याने मला त्याच्या टीचर ने शिकवलेली एक गोष्ट सांगितली. ती सांगत असताना ही तो थरथरत होता.
असो, यावर त्या संबंधित टीचर ना मी हे एक पत्र लिहिले आहे जे मुद्दाम इकडे पोस्ट करतोय . या आणि अशा शाळेत आणि असा अभ्यासक्रम ( जो अजून बराच आहे ) असलेल्या शाळेत का पाठवता मग मुलाला बदला शाळा असे अनेक उपाय मला यावरून सांगण्यात येतील हे नक्की मला मुद्दाम हे सांगायचे आहे की भारतात आणि अनुषंगाने महाराष्ट्रात , कुठल्या ही बोर्ड चा हा काय अभ्यासक्रम आहे या बद्दल आणि त्यातून मुलांची होणारी जडण घडण , याबद्दल मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार होतो का ? तुम्हा कोणाला असे अनुभव आलेत का ? आदरणीय गुरुजनवर्ग, आशा आहे की हे पत्र वाचून तुमची तब्येत चांगली असेल. मी तुमच्या एका विद्यार्थ्याचा, रणवीर प्रधानचा पालक आहे, जो ७ वी ब मध्ये शिकतो. काल, माझ्या मुलाने घरी येऊन इंग्रजीच्या तासाला तुम्ही सांगितलेली एक गोष्ट सांगितली. एमेट टिल नावाच्या १४ वर्षांच्या आफ्रिकन अमेरिकन मुलाची ही कहाणी, ज्याची त्याच्या गोऱ्या वर्णाच्या चुलत भावांनी निर्घृणपणे हत्या केली आणि नंतर त्याचे विकृतीकरण केले. त्याने मला संपूर्ण कथा सांगितली तेव्हा हे सांगताना माझ्या मुलाला भयंकर अस्वस्थता जाणवली. किंबहुना, त्या गोऱ्या मुलांचे कृत्य ऐकून इतर मुलांनाही तितकाच त्रास झाल्याचे त्याने मला सांगितले. मी ऑनलाइन गेलो आणि कथेचे सत्य शोधण्यासाठी गुगल केले. ही कथा खरी असू शकते आणि मला विश्वास आहे की तुम्ही त्यांना बाल क्रूरता तसेच एक असमान जग समजून घेण्याच्या उद्देशाने सांगितले आहे जिथे निरपराधांची हत्या केली जाऊ शकते, मला एक प्रश्न विचारायचा आहे: अशा स्वरूपाची आणि अत्यंत हिंसाचाराची कथा या शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावी का?
कृष्णवर्णीय मुलांच्या आशावादी कथा किंवा कृष्णवर्णीय समुदायाच्या कथा नाहीत का ज्यांचा शेवट हा सकारात्मक असेल ? फक्त एक वडील म्हणून नाही तर बालमानसशास्त्र समजून घेणारा एक कलाकार म्हणून, अशा निर्णायक वयात मुलांचे मत आणि स्वभाव घडवण्यासाठी शिक्षक आणि पालक अत्यंत आवश्यक आहेत असे मला वाटते. अशा हिंसक घटनांचे कथन करणे, ते कितीही वास्तविक किंवा कटू असले तरीही, केवळ नकारात्मक दृष्टीकोनातूनच त्याचा त्यांच्या मनावर परिणाम होत असतो. मी तुम्हाला विनंती करेन की अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या आणि अत्याचाराच्या कथा छापण्यापेक्षा त्या वयाच्या मुलांचा विचार केला जावा. तुमचाच प्रामाणिक , वीरेन प्रधान”. वीरेंद्र प्रधान यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी समर्थन दाखवले आहे. आणि अशा प्रकारच्या शैक्षणिक पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुलांना ज्या त्या वयात योग्य शिक्षण द्यायला हवे तसेच शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडून यावेत अशी एकंदरीत मागणी केली जात आहे.