माझ्या नवऱ्याची बायको मधील अथर्वची आई देखील आहे अभिनेत्री…जय जय स्वामी समर्थ मालिकेत साकारलीय हि भूमिका
चित्रपट मालिका सृष्टीत हिट झालेल्या बालकलाकारांचे आईवडील देखील अभिनय क्षेत्रात दाखल होतात असे क्वचितच पाहायला मिळाले आहे. अर्थात त्या पालकांमध्ये असलेली अभिनयाची आवड ते आपल्या मुलांकडून पूर्ण करून घेत असतात. पण यातूनच त्यांनाही कुठेतरी अभिनय क्षेत्राची वाट गवसते. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणा आणि अंजलीबाईंची मुलगी लक्ष्मी तुम्हाला नक्कीच आठवत असेल. वाग्मी शेवडे या बलकलाकाराने ही भूमिका साकारली होती. पण वाग्मी हिट झाल्यानंतर तिच्या आईला देखील मालिका क्षेत्रात झळकण्याची संधी मिळाली होती. झी मराठीच्याच काही मालिकेत तिची आई छोट्या छोट्या भूमिकेत दिसली होती. नाटकातून काम केल्यामुळेच वाग्मीची आई अभिनय क्षेत्रात आली होती. असाच काहीसा प्रकार माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील बालकलाकाराच्या बाबतीत पाहायला मिळत आहे.
झी मराठीची गाजलेली मालिका म्हणून माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेकडे पाहिले जाते. २०१६ ते २०२१ या एवढ्या वर्षात मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. या मालिकेत गुरुनाथ आणि राधिकाच्या मुलाची म्हणजेच अथर्वची भूमिका बालकलाकार आर्यन देवगिरी याने साकारली होती. आर्यन देवगिरी सध्या शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. कांदिवलीच्या ऑक्सफर्ड पब्लिक स्कुलमध्ये तो शिकत आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेअगोदर तो पुढचं पाऊल मालिकेत कल्याणीच्या मुलाची भूमिका साकारताना दिसला होता. पण माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. मधल्या काळात तो एका व्यवसायिक जाहिरातीत झळकला होता. पण आर्यनला अभिनयाचे हे बाळकडू त्याच्या आईकडूनच मिळाले होते असे म्हणायला हरकत नाही. आर्यन देवगिरीची आई सुनीता देवगिरी या देखील अभिनेत्री आहेत.
आर्यनला मिळालेल्या प्रसिद्धीचा त्यांनाही मोठा फायदा झाला आहे. कारण जय जय स्वामी समर्थ या कलर्स मराठीच्या मालिकेत त्यांना पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली आहे. गयाबाई हे पात्र त्या या मालिकेतून साकारताना दिसल्या. विजय पाटकर यांच्यासोबत त्यांना गारीगर या चित्रपटात येण्याची संधी मिळाली आहे. या मालिकेअगोदर सुनीता यांनी साता जल्माच्या गाठी या मालिकेत नायिकेच्या आईची भूमिका साकारली होती. अभिनय क्षेत्राची ही वाट त्यांना आर्यनकडूनच सापडली असे म्हणायला हरकत नाही. अर्थात त्यांच्याकडे असलेल्या अभिनयाची उत्तम जाण असल्यामुळेच हे सर्व शक्य झालं हे विसरून चालणार नाही.